31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeआरोग्यवाढदिवसानिमित्त मंत्री एकनाथ शिंदे यांचे अनोखे समाजकार्य; हृदयाला छिद्र असलेल्या १०० मुलांवर...

वाढदिवसानिमित्त मंत्री एकनाथ शिंदे यांचे अनोखे समाजकार्य; हृदयाला छिद्र असलेल्या १०० मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करणार

टीम लय भारी

ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा आज (९ फेब्रुवारी) वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी अनोखी व उत्तुंग मोहिम हाती घेतली आहे. हृदयाला छिद्र असलेल्या तब्बल १०० लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प शिंदे यांनी सोडला आहे.

वाढदिवसानिमित्त मंत्री एकनाथ शिंदे यांचे अनोखे समाजकार्य; हृदयाला छिद्र असलेल्या १०० मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करणार

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल यांनी एकत्रितपणे ठाण्यात आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच या शिबीराला सुरूवात झाली आहे.

या शिबिराअंतर्गत ० ते १६ वयोगटातील मुलांवर उपचार करण्यात येणार आहेत. टू-डी इको कार्डिओलॉजी तपासणी, मोफत कार्डिॲक सर्जरी कन्सल्टेशन तसेच जन्मतः हृदयाला छिद्र असणाऱ्या मुलांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ही वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. या शिवाय अन्य आजार असलेल्या रूग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, सिद्धिविनायक मंदीर ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्या माध्यमातूनही अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. हे आरोग्य शिबीर आज (९ फेब्रुवारी) ज्युपिटर हॉस्पिटल, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ठाणे (पश्चिम) येथे सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू असेल.

वाढदिवसानिमित्त मंत्री एकनाथ शिंदे यांचे अनोखे समाजकार्य; हृदयाला छिद्र असलेल्या १०० मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करणार
जाहिरात

मंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे पितापुत्र गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य लोकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवितात. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष सुरू केला आहे. या कक्षाच्या कार्यालयामध्ये कोणताही रूग्ण अथवा त्याचे नातेवाईक गेले तरी त्यांना योग्य ते मार्गदर्शन व मदत केली जाते. आजारपणामुळे अडचणीत सापडलेल्या अनेक कुटुंबांना शिंदे पितापुत्रांमुळे मोठा आधार मिळाला आहे. वरिष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मंगेश चिवटे हे या कक्षाची जबाबदारी सांभाळतात.

अधिक माहितीसाठी संपर्क : मंगेश चिवटे, वैद्यकीय मदत कक्षप्रमुख ( मो.9423902525), शिवसेना वैद्यकीय मदतकक्ष कार्यालय (0222532567, 8275923030).

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांनी तहसिलदारांना खूर्चीत बसविले, अन् त्यांच्यासोबत फोटो काढला; तहसिलदार म्हणाले, हा अविस्मरणीय क्षण

आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण

आदित्य ठाकरेंच्या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारीही झाले चकीत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी