26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeएज्युकेशनशाळांतील शिक्षकांनाही सुटी, अतिनिकडीचे काम असेल तरच शाळेत यावे लागणार

शाळांतील शिक्षकांनाही सुटी, अतिनिकडीचे काम असेल तरच शाळेत यावे लागणार

टीम लय भारी

मुंबई : करोनाचा ( Coronavirus ) प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची मूभा द्यावी. दहावी, बारावीच्या परीक्षा, आरटीईचे प्रवेश व इतर अति महत्वाची कामे असतील तरच शिक्षकांना कामासाठी शाळेत बोलवावे अशी शिफारस शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी राज्य सरकारला केली आहे.

शाळेत बोलविलेल्या शिक्षकांसाठी खबरदारीची सगळी उपाययोजना करावी. स्थानिक आवश्यकता लक्षात घेऊन शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील शिक्षकांना योग्य त्या सुचना कराव्यात असेही सोळंकी यांनी केलेल्या शिफारस पत्रात म्हटले आहे.

शाळांतील शिक्षकांनाही सुटी, अतिनिकडीचे काम असेल तरच शाळेत यावे लागणार

सोळंकी यांनी केलेल्या या शिफारशीच्या फाईलवर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची अद्याप स्वाक्षरी झालेली नाही. मंगळवारी वर्षा गायकवाड व अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांची बैठक होईल. या बैठकीत उचित निर्णय घेतला जाऊन तो जारी होईल अशी माहिती सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली.

शहरी व ग्रामीण भागातील मुलांना येत्या 31 मार्चपर्यंत सुटी देण्याचा निर्णय अगोदरच घेण्यात आला आहे. आता शिक्षकांनाही तो लागू झाला आहे.

हे सुद्धा वाचा

Breaking : राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद, दहावी – बारावी वगळून सर्व परीक्षा रद्द

राज्यातील शहरी शाळा, महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद राहणार : राजेश टोपे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी