टीम लय भारी
मुंबई :- भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होतीय. भारताचा शेजारी पाकिस्तानमधून भारतीय बांधवांसाठी प्रार्थना सुरु केली आहे. पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू शोएब मलिक (Shoaib Malik) याने आपल्या भावना भारतीयांप्रती व्यक्त करत अल्लाहकडे दुवा मागितली आहे. हे अल्लाह भारतीयांना कोरोनाविरोधी लढ्यासाठी बळ दे, असे म्हणत लवकरच भारत कोरोनावर मात करेन, असा आशावादही त्याने व्यक्त केला आहे (Pakistan Shoaib Malik Pray For India Over Indians Fight Against Covid 19).
शोएब मलिकची अल्लाहकडे दुवा
“भारतीयांसाठी सध्या कठीण दिवस आहेत. प्रत्येक जण कोरोनाच्या या अवघड परिस्थितीतून जात आहे. संपूर्ण पाकिस्तानच्या भावना भारतीयांसोबत आहे (The sentiments of the whole of Pakistan are with the Indians). मी अल्लाहकडे दुवा मागतो की, भारतीयांना लढण्यासाठी अल्लाहने शक्ती द्यावी. भारतीयांना कोरोनाला हरविण्यासाठी आता हिम्मत ठेवावी लागेल. मला आशा आहे की, भारतीय बांधव लवकरच कोरोनावर मात करतील”, अशा भावना शोएब मलिकने व्यक्त केल्या आहेत.
रेमडिसीवर वादावर सुजय विखे-पाटलांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
शोएब मलिकने ट्विटमध्ये काय म्हटले..?
भारतातल्या कठीण परिस्थितीवर तसेच भारतीयांना धीर देणारे ट्विट शोएब मलिकने केले आहे (Shoaib Malik tweeted about the difficult situation in India as well as reassuring Indians). तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, “या कठीण काळात भारतीय बांधवांसाठी माझी प्रार्थना, भारतात कोरोनाची आलेली दुसरी लाट परतावून लावण्यासाठी अल्लाह आपल्याला मदत करो, भारतीयांनी हिम्मत ठेवावी.”
– Thoughts and prayers with India in these difficult times, may the Almighty help us to tide over the unprecedented tragedies of Covid’s second wave. Stay strong India
— Shoaib Malik 🇵🇰 (@realshoaibmalik) April 25, 2021
रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरची अल्लाहकडे दुवा
“भारतासाठी सध्याचा काळ हा मुश्कील काळ आहे. इथे दररोज लाखो रुग्णांना कोरोनाची बाधा होत आहे तर कित्येक जणांना औषधोपचार न मिळाल्याने जीवाला मुकत आहेत. मी अशा सर्व भारतीयांसाठी अल्लाहकडे दुवा (प्रार्थना) मागतो (Asks prayer to Allah for Indians). या सर्व परिस्थितीशी झुंजण्यास भारतीयांना बळ मिळो, अशी प्रार्थना करतो तसेच पाकिस्तान सरकारकडे ही मी आवाहन करतो की, भारताला ऑक्सिजनचा पुरवठा करुन मदत करावी (Help India by supplying oxygen)”, असे शोएब अख्तरने म्हटले आहे.
Coronavirus: India likely to get first batch of Russia’s Sputnik V vaccine by May-end
“भारत सध्या एका कठीण काळातून जात आहे. कित्येकांना कोरोनाची लागण होती तर कित्येकांना जीव सोडावा लागतो. अशा परिस्थितीत भारतासाठी ग्लोबर सपोर्टची गरज आहे. या महामारीच्या काळात आपण सगळे सोबत आहोत”, असे शोएब म्हणाला (Pakistan Shoaib Malik Pray For India Over Indians Fight Against Covid 19).
विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.