30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeसिनेमादाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

टीम लय भारी

मुंबई :- केजीए चॅप्टर 1 चित्रपटाने चाहत्यांना (Fans) मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती. सुपरस्टार यशने (Yash) त्याच्या विस्मयकारक प्रदर्शनाने थक्क केले होते. त्यामुळे या चित्रपटाने जोरदार कमाई केली होती. पण आता चाहत्यांना (Fans) उत्सुकता चॅप्टर 2 ची आहे. यात मुख्य भूमिकेत यश (Yash) असून त्याच्या सोबत अभिनेता संजय दत्त आणि रवीना टंडन मुख्य भूमिकेत असणार आहेत.

चॅप्टर 2 टिझर हा सुपरस्टार यशच्या (Yash) वाढदिवसा दिवशी रिलीज करण्यात आला होता. टिझर रिलिज होताच चाहत्यांचा (Fans) त्याला भरभरून प्रतिसाद मिळला होता. टिझरमुळे चाहत्यांना (Fans) हा चित्रपट कधी रिलीज होतो याची उत्सुकता लागली होती.

कॉंग्रेसच्या माण तालुकाध्यक्षपदी दादासाहेब काळे यांची नियुक्ती

उद्धव ठाकरे शिवसैनिकांना देणार कानमंत्र, वर्धापन दिनानिमित्तच्या भाषणाकडे साऱ्यांचे लक्ष

Yash’s KGF Chapter 2 won’t release on July 16 due to Covid-19 pandemic

हा चित्रपट 16 जूनला रिलीज होणार होता अद्याप ही चित्रपट रिलीज झाला नाही आहे. त्यामुळे चाहता (Fans) वर्ग खूपच नाराज झालेला आहे. मात्र मुख्य कारण म्हणजे कोरोनाच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली, पण ही सुपरस्टार यशच्या (Yash) चाहत्यांसाठी (Fans) वाईट बातमी ठरली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या माहितीनूसार, केजीएफ चॅप्टर २ च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरु आहे. तसेच थिएटर पुन्हा सुरु झाल्यावर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीज डेटची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी