27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रछगन भुजबळांची पुरग्रस्तांसाठी 'मोठ्या मदती'ची घोषणा

छगन भुजबळांची पुरग्रस्तांसाठी ‘मोठ्या मदती’ची घोषणा

टीम लय भारी
मुंबई : पुरग्रस्तांना अन्नधान्या बरोबरच केरोसीन सुद्धा देण्यात येईल. तसेच आपत्तीग्रस्त 6 जिल्ह्यात शिवभोजन थळ्यांची संख्या वाढवण्यात येईल. असे दिनांक 14 जुलै रोजी छगन भुजबळ यांनी जाहीर केले. ( Chagan bhujbal to help in flooding situation)

पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालघर ठाणे सोबतच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली व कोल्हापूर आशा 6 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते. येथील शेतकऱ्यांचे व व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्यामुके सरकारातून त्यांना अन्न धान्य व त्याच बरोबर केरोसीन सुद्धा देण्यात येईल. स्थानिकांच्या घरांसोबतच दुकाने व शेते सुद्धा वाहून गेली आहेत. (Food and grains and lentils to distribute to people for free)

मंत्री यशोमती ठाकूर धावल्या अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी

टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकून मीराबाई चानू यांनी रचला इतिहास

राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांनी हा निर्णय घेतल्याचे मंत्रालय दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत आदेश तातडीने काढण्यात येईलच परंतु आदेशाची वाट न बघता लगेचच मदत वाटप सुरू करावे असेही छगन भुजबळ म्हणाले.

Chagan
प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ तसेच 5 लिटर केरोसीन मोफत दिले जाईल.

राज्यावर आलेलं संकट  आपत्तीग्रस्तांचे नसून संपूर्ण राज्याचे आहे. अशावेळी राज्यसरकार खंबीरपणे राज्यवासीयांच्या मदतीला उभे ठाकेल.

वीज पुरवठा पूर्ववत चालू झाला नसल्यामुळे केरोसीन चा वापर होऊ शकतो. तसेच काही भागातील शिवभोजन थाळी केंद्रे वाहून गेल्यामुळे तिथले वितरण बंद होणार नाही तर इतर ठिकाणी असलेल्या केंद्रांतून त्यांना शिवभोजन वितरित केले जावे. असेही यावेळी छगन भुजबळ म्हणाले. या कामात स्थानिक पातळीवर तहसीलदारांनी मदत करावी अशी सूचना लहासिलदारांस मिळालेली आहे. (Shivabhojan thalis being distributed)

चिपळूण – खेडमधील पुरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी वायूदलाची कसरत

KSE tries to pacify flood-affected residents in Shivamogga

प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ तसेच 5 लिटर केरोसीन मोफत दिले जाईल. ज्यांना गहू नको असेल त्यांना तांदूळ देण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्याच बरोबर 5 किलो डाळ मिळेल असे सांगण्यात आले आहे.

मृत व्यक्तीच्या कुटूंबियांना त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत भुजबळांनी या वेळी हळहळ व्यक्त केली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी