29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयरविकांत तुपकरांचे मोदी सरकारविरोधातील अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित

रविकांत तुपकरांचे मोदी सरकारविरोधातील अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित

टीम लय भारी

बुलढाणा: सोयाबीन आणि कापसाला हमी भाव मिळावा यासाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे गेल्या चार दिवसांपासून बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरु आहे(Ravikant Tupkar’s hunger strike finally postponed)

मात्र या आंदोलनामुळे तुपकरांची प्रकृती दिवसेंदिवस अधिक ढासळत असल्याने कार्यकर्ते चिंतेत होते. अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्र सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याने तुपकर यांनी स्वत: आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.

पण आताही अंध भक्त बोलतील, ‘‘काय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक!’’

‘त्या सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांचं अभिनंदन करावं, भाजपला टॅग केलं तरी हरकत नाही’

आंदोलनाला हिंसक वळण

दरम्यान अन्नत्याग आंदोलनामुळे काल रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे या आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. दरम्यान आक्रमक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत तुपकरांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवला.

प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले होते. यातील एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

अंमली पदार्थांच्या विरोधात भाजपाची जनजागृती, तर जनजागृती केल्याप्रकरणी पोलिसांनी बजावली नोटीस

Meet the man on a mission to save the wild berries of Maharashtra

यामुळे आंदोलन आणखीच चिघळले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर- औरंगाबाद राज्य महामार्गावरील वाहतूक थांबवत रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली, तसेच पोलिसांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या. दरम्यान आंदोलन शांत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करत तुपकरांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. या ठिकाणी आता पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

१७ नोव्हेंबरपासून रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. यात १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. मात्र तुपकरांच्या आंदोलनाने शुक्रवारी रात्री पुन्हा हिंसक वळण घेतले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा तहसीलदारांची गाडी पेटवली.

तुपकरांची प्रकृती खालावत असून प्रशासन मात्र काहीच निर्णय घेत नसल्याने शेतकरी आणि कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान प्रशासनाकडून या हिंसक आंदोलनाची सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यातच पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी