27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रदिंडीत जेसीबी घुसल्याने दोन वारकरी ठार, पंधरा जखमी

दिंडीत जेसीबी घुसल्याने दोन वारकरी ठार, पंधरा जखमी

लय भारी न्यूज नेटवर्क

पुणे : कार्तिकी वारीसाठी पंढरपुरहून आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत दिवे घाटात जेसीबी घुसल्याने दोन वारक-यांचा मृत्यू झाला. पंधरा वारकरी जखमी झाले. संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी अशी मृत्यू झालेल्या वारक-यांची नावं आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.

संत नामदेव महाराज यांची पालखी दरवर्षी निघत असते. दरवर्षी हजारो वारकरी यामध्ये सहभागी होतात. पंढरपूरवरून आळंदीला पालखी परत येत असताना दिवे घाटात आज सकाळी अपघात झाला. पालखी दिवेघाटात असताना जेसीबी अचानक या पालखीत घुसली. त्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. पंधरा जण जखमी आहेत. सर्व जखमींवर उपचार सुरु आहेत.

पालखीला पोलीस बंदोबस्त दिला नव्हता. दरवर्षी पोलीस बंदोबस्त मागितला जातो परंतु पोलीस आमच्या मागणीचा विचार करत नाहीत. जर पोलीस बंदोबस्त मिळाला असता तर आमच्या दोन वारक-यांचे जीव गेले नसते. पंधरा वारकरी जखमीही झाले नसते. असा आरोपही पालखीच्या आयोजकांकडून करण्यात आला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी