25 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्ररावसाहेब दानवेंनी शिवसेनेच्या 'या' नेत्याला ठरवलं वेडं

रावसाहेब दानवेंनी शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला ठरवलं वेडं

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : सत्तेची वाट पाहणाऱ्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना वेड लागलं आहे. त्यांना वेड्याच्या रुग्णालयात ठेवण्याची गरज आहे.” असं टीकास्त्र भाजप नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांच्यावर सोडलं आहे.

आज सोमवारी दानवे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी दानवेंनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली. संजय राऊत यांनी सकाळी सत्तेसाठी भाजपच्या नेत्यांना वेड लागलं आहे. यावर बोलताना दानवे म्हणाले, आम्ही काही आज सत्तेत आलेलो नाही. अनेक वेळा सत्तेत आलो आहे. मात्र सत्ता येण्याची वाट पाहात असताना संजय राऊतांना वेड लागलं आहे. त्यांना कुठल्या तरी वेड्याच्या रुग्णालयात ठेवण्याची वेळ आली आहे. त्यांना आताही काय बोलावे आणि काय बोलू नये हे समजत नाही. अशी टीका दानवे यांनी केली.

“राष्ट्रवादीच्या गट नेते अजित पवार यांनी स्वतः उपस्थित राहून आमदारांचं समर्थन दाखवलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केल्याचा संजय राऊत यांचा आरोप चुकीचा आहे. अजित पवार जो व्हीप काढतील तोच राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होईल. अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यामुळे त्यांनी जारी केलेला व्हीप हा सर्व आमदारांना लागू होईल,” असेही दानवे म्हणाले.

शेतकरी अडचणीत असताना भाजप आमदार शेतकऱ्याच्या बांधावर आहे. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार मात्र फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत आहेत. असा आरोप दानवे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीकडे १६२ आमदार, फडणवीस – पवारांकडे उरले अवघे १२६ जण

खळबळजनक : भाजपने लपविलेले पाच आमदार कडक पहारा फोडून शरद पवारांनी आणले परत

शरद पवार म्हणाले, अजित पवारांना माझा छुपा पाठिंबा सुद्धा नाही

भाजपला तूर्त दिलासा : न्यायालय उद्या निकाल देणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी