31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृतीत सुधारणा

धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृतीत सुधारणा

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना आज ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. प्रकृतीची विचारपूस करणाऱ्या सर्व कार्यकर्ते हितचिंतक आणि सर्व पक्षाच्या नेतेमंडळीचे  मुंडे यांनी आभार मानले आहेत. (Dhananjay Munde’s condition improves, discharged from hospital)

धनंजय मुंडे यांना चार दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयाने आज त्यांना डिस्चार्ज दिला आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच मी पुन्हा पूर्वीसारखा बरा होऊन जनसेवेत दाखल होईन. दरम्यान डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे कार्यकर्त्यांनी काही दिवस भेटीसाठी येऊ नये मी स्वतः लवकरात लवकर स्वतः कार्यकर्त्यांना येऊन भेटेल असे आवाहनही मुंडे यांनी केले आहे. (Dhananjay Munde’s condition improves, discharged from hospital)


हे सुद्धा वाचा : 

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी मिळवला सिंधुताई सपकाळांच्या संस्थेला अनुदान देण्याचा पहिला मान

Dhananjay Munde : पानगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकाच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करणार – मंत्री धनंजय मुंडे

कोल्हापूरात जनतेचा कौल काँग्रेसला मात्र काही हजारोंनी वाढलेल्या मतांमध्ये चंद्रकांत पाटलांनी मानले समाधान

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी