29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रगुरूदेव दर्शन सहज शक्य! 'शिर्डी' आणि 'अक्कलकोट'साठी एसटीच्या सुरू होणार विशेष फेऱ्या

गुरूदेव दर्शन सहज शक्य! ‘शिर्डी’ आणि ‘अक्कलकोट’साठी एसटीच्या सुरू होणार विशेष फेऱ्या

टीम लय भारी

ठाणे : सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी वरदान ठरलेली ‘लालपरी’ नेहमीच सुखाचा आणि सुरक्षित प्रवास घडवत असते. वारी, गणोशोत्सव, जत्रा या सगळ्याच कारणांसाठी लालपरी नेहमीच सज्ज असल्याचे पाहायला मिळते. यंदाच्या वारी सोहळ्यानंतर एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाने एक स्तुत्य कार्यक्रम सुरू केला आहे.

गुरूपोर्णिमेचे निमित्त साधून ठाणे विभागाकडून शिर्डी, अक्कलकोट, खोपोली, गणेशपुरी अशा धार्मिकस्थळांना भेट देण्यासाठी विशेष एसटी बसच्या फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना काळात धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे अनेक भाविकांचा हिरमोड झाला होता, परंतु यावर दिलासा देत ठाणे एसटी आगाराने भाविकांसाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे दर्शन घडविण्याचे मंगलकार्य हाती घेतले आहे.

या उपक्रमाअंतर्गत ठाणे आणि कल्याण येथून शिर्डी, अक्कलकोट, खोपोली, गणेशपुरी याठिकाणी जाणाऱ्या सात जादा गाड्यांचं नियोजन ठाणे विभागाच्या एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा…

राजकीय पक्षांना चपराक; ओबीसी आरक्षणाशिवाय होणार निवडणुका, सर्वोच्च न्यायालयाकडून निर्देश

अभिनेता शाहिद कपूर पत्नीला वैतागला

सोबत शस्त्र बाळगताय….? हे जरुर वाचायलाच हवे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी