31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमंत्रालयMantralaya : 'मंत्रालयात रक्कमा घेतल्या जातात, म्हणून बार्टीचा कारभार वाईट'

Mantralaya : ‘मंत्रालयात रक्कमा घेतल्या जातात, म्हणून बार्टीचा कारभार वाईट’

बार्टी आणि प्रशिक्षण केंद्र प्रमुख यांच्या या सगळ्या गोंधळात कोणाची बाजू खरी यावर खरा सवाल उपस्थित केला जात असताना याबाबत आणखी काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

सकाळपासूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतील (बार्टी) संदर्भातील बातमी सगळ्याच समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे. या संस्थेतील अधिकारी मंत्रालयाचे नाव वापरून प्रशिक्षण संस्थेकडून शुल्कात 21 टक्के दराने पैसे उकळण्याचे काम चालू असल्याचा सूर काही प्रशिक्षण संस्थेच्या प्रमुखांनी लावला होता. परंतु यावर प्रतिक्रिया देत बार्टीकडून सदर आरोप फेटाळून लावत काही केंद्रे केवळ दबाव आणण्यासाठी चुकीची तक्रार करत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान या सगळ्या गोंधळात कोणाची बाजू खरी यावर खरा सवाल उपस्थित केला जात असताना याबाबत आणखी काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या संपुर्ण प्रकरणाचा बार्टी अधिकार स्टुडंट हेल्पींग हँडसचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी उलगडा केला आहे. कुलदीप आंबेकर यावेळी म्हणाले, प्रशिक्षण केंद्राच्या चालकांनी केलेली तक्रार चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे सांगण्यात आले आहे. कारण केंद्रचालकच मंत्रालयात जाऊन तिथे रकमा जमा करून बार्टी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्रातील महासंचालक, निबंधक यांच्यासह सगळीत मंडळी केंद्रचालकांच्या दबावाला कधीच बळी पडत नाही, ते तेवढे खमके आणि सक्षम आहेत त्यामुळेच की काय केंद्रप्रमुखांना पोटशूळ उठते असा सवाल आंबेकर यांनी केला आहे.

कुलदीप आंबेकर पुढे म्हणतात, बार्टीबदल आज पुळका का आला. कारण, जिथे चांगले प्रशासकीय मंडळी निस्वार्थ व पारदर्शकपणे काम करतात. विद्यार्थीहीत व समाजाच्या हीताचे प्रश्न मार्ग लावतात.अशावेळी त्यांना पाठींबा देणे गरजेचे असते ते मी करत आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा ही सत्यता पडताळून व्यक्त व्हावे. फक्त योजनांचा लाभार्थी बनने हाच फक्त उद्देश आपला नसावा. या बिनबूडाच्या आरोपाला काही तथ्थ नाही, असेल तर त्यांनी पुराव्यासह केंद्रप्रमुखांनी समोर आणली असती पण असे काहीच झाले नाही असे म्हणून यावेळी आंबेकर यांनी थेट विद्यार्थांना पुढाकार घेण्याविषयी सुचवले आहे.

हे सुद्धआ वाचा…

Mantralaya : ‘मंत्रालया’च्या नावाने अधिकाऱ्यांची ‘वसुली’ !

Director Vaibhav Palhade : अकोल्याचा दिग्दर्शक वैभव पल्हाडे हॉलिवूड सिनेसृष्टीत करतोय पदार्पण

Mumbai Metro 3 : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुलाबा सिप्झ मेट्रो लाईन-3 ची यशस्वी चाचणी

मुळातच या तक्रार केंद्रप्रमुखांनी कधीतरी या विद्यार्थीच्या प्रगतीवर गुणवत्तेवर, निकालवर आणि अत्याधुनिक सुखसुविधा यावरती बोलले का वो.? अजिबात नाही. येथे मात्र त्यांची दातखिळी बसते. कुठेतरी कोपर्‍यात दोन खोल्यात क्लास घेतात. मंत्र्यांना मँनेज करतात. समाजाचे हित आम्हीच पाहतो असा वरून कांगावा करतात. अशी नाकांनी वांगी सोल्याचे यांनी आधी बंद करावे. ही त्यांची दुटप्पी भुमिका योग्य नाही, असे म्हणून आंबेकर यांनी टीका केली आहे.

पुढे कुलदीप आंबेकर म्हणतात, बार्टी या संस्थेमध्ये काही काळापुर्वीच नवीन महासंचालक धम्मज्योती गजभिये सर व निबंधक इंदिरा अस्वार मँडम यांची नियुक्ती झाली. ते झपाट्याने व अत्यंत प्रामाणिक व पारदर्शक काम करतात. ते नवनवीन बदलही करत आहेत. त्यांचे कौतुकच केले पाहीजे. काहीवेळा वेळ लागेल पण कोणतेही अपेक्षा न ठेवता ते काम करतात, लागेल ते सहकार्य करत आहेत. परंतु वर्षानुवर्षे टेंडर प्रक्रीयेत मुठभर प्रशिक्षण क्लासवाले आजपर्यत होते. आता ते सर्वसामान्य खरंच प्रामाणिक,गुणवत्ता असणार्‍या क्लासवाल्यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील असतात, तर यांच्या पोटात का दुखत आहे, असा सवालच त्यांनी येथे उपस्थित केला आहे.

नुकतेच बँकिग ,रेल्वे,आणी एलआयसी प्रशिक्षणपरीक्षा केंद्राचे राज्यातील 12 ठिकाणी टेंडर निघाली. या तक्रार केंद्रप्रमुखांना हवे असे नियम बनले केले नसावेत, म्हणून यांचा तीळपापट झाला आहे. फक्त विद्यावेतन व क्लासचे टेंडर या संदर्भातच बार्टीच्या हितचिंतकाना काळजी. बाकी योजनावर शब्दही चकार काढत नाहीत. सीईटी, जेईई करणार्‍या विद्यार्थीचे दोनवर्षापासुन योजनाच बंद,कौशल्य विकास योजनांच्या फंडाचे काय,परदेशातील विद्यार्थीच्या प्रशिक्षण व संख्येत वाढ होणार होती या बद्दल काय, लाभार्थी व हिंतचिंतकांनी याविषयी भुमिका व्यक्त केली पाहिजे.

फक्त विद्यावेतन ,टेंडर रखडले, या नावानी शिमगा करायचा. ठिक आहे न. विद्यावेतन देणे हे कर्तव्यच आहे बार्टीचे.पण इतरही बाबीवर बोला की! केंद्रप्रमुख मंत्रालयात बसून बार्टी बदनाम करण्याचे षडयंत्र करत आहेत. बार्टी विकासाच्या निधीवर, नवीन बदलावर त्यांच्या योजना व कामकाजवर काही न बोलता फक्त आणी फक्त टेंडर वर त्यांचा नजरा आहेत. असली मंडळी कुर्‍हाडीचा दांडा गोत्यास काळ असते बार्टीला फक्त नावाला स्वायत्ता आहे.

प्रत्येक गोष्टी महासंचालकास मंत्रालयात विचारावी लागते हे दुर्दंव आहे. सर्व स्वायत्ता महासंचालकांस द्या. बघा काम कशी होतात ते. या खात्याला मंत्री नाही. खुद्द मुख्यमंत्रीकडे हे खाते आहे. अशावेळी बार्टीच्या अधिकार्‍यांवर आरोप करणे म्हणजे खेदजनक बाब आहे. केंद्रप्रमुखांचा करावा तेवढा निषेध कमीच असे म्हणून कुलदीप आंबेकर यांनी निषेध व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी