27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeक्रीडाMS Dhoni Live : धोनीच्या मनात नेमकं काय सुरूये! आज दुपारी 'या'वेळी...

MS Dhoni Live : धोनीच्या मनात नेमकं काय सुरूये! आज दुपारी ‘या’वेळी साधणार चाहत्यांशी संवाद

धोनी 25 सप्टेंबरला फेसबुकवर लाईव्ह येणार आहे. धोनीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, "मी तुमच्यासोबत एक बातमी शेअर करणार आहे. 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता लाईव्ह येऊन मी ही माहिती देईन, त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अनेकदा सोशल मीडियापासून दूर राहतो, मात्र त्याने त्याच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकल्याने सट्ट्याचा बाजार चांगलाच तापला आहे. धोनी 25 सप्टेंबरला फेसबुकवर लाईव्ह येणार आहे. धोनीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, “मी तुमच्यासोबत एक बातमी शेअर करणार आहे. 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता लाईव्ह येऊन मी ही माहिती देईन. मला आशा आहे की तुम्ही सर्व तिथे असाल.” धोनीच्या या फेसबुक पोस्टमुळे आता तो इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्तीची घोषणा करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. धोनीने दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. अशा परिस्थितीत धोनी आयपीएल 2023 मध्ये शेवटच्या वेळी मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे.

धोनीने आयपीएलमध्ये सीएसकेला चार वेळा चॅम्पियन बनवले

आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक, चेन्नई सुपर किंग्ज धोनीच्या नेतृत्वाखाली चार वेळा चॅम्पियन बनले आहे. 2022 मध्ये आयपीएलमध्ये संघाची कामगिरी मात्र काही खास नव्हती. या हंगामाच्या सुरुवातीला धोनीने रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले, मात्र संघाच्या सततच्या पराभवामुळे त्याने पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवले. याशिवाय, हंगामाच्या शेवटच्या सामन्यानंतर धोनीने सांगितले होते की तो आयपीएल 2023 मध्येही सीएसकेकडून खेळणार आहे.

हे सुद्धा वाचा…

Maharashtra Politics : संदिपान भुमरेंनी उद्धव ठाकरेंची केली ‘नवरी’शी तुलना

Maharashtra Politics : केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांचा गंभीर आरोप

Auto-Rickshaw and Taxi Fare Hike: मुंबईकरांच्या खिशाला कात्री! रिक्षा भाडे महागले

त्याच वेळी, आयपीएल 2023 मध्ये होम आणि अवे व्हेन्यूचा नियम पुन्हा लागू केला जात आहे. अशा परिस्थितीत धोनी सीएसकेच्या घरच्या मैदानावर खेळून निवृत्तीची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. धोनी शेवटचा 2019 मध्ये चेन्नईत खेळला होता. यानंतर आयपीएल 2020 चा संपूर्ण हंगाम यूएईमध्ये खेळला गेला. 2021ची आयपीएल युएईमध्ये झाली. नंतर 2022 आयपीएल महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. अशा परिस्थितीत 2023 मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये सीएसकेच्या घरच्या मैदानावरील स्थानिक चाहते योलो जर्सीमध्ये खेळण्यासाठी मैदानात उतरतील, असा विश्वास आहे.

टीम इंडियात मिळू शकते महत्त्वाची जबाबदारी

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसीची सर्व प्रमुख विजेतेपदे जिंकली आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 टी20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. मात्र, त्यानंतर भारतीय संघाला आयसीसीच्या कोणत्याही मोठ्या स्पर्धेत यश मिळालेले नाही. अशा परिस्थितीत धोनीला टीम इंडियामध्ये मार्गदर्शकाची भूमिका दिली जाऊ शकते. याच भूमिकेत धोनी 2021च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाशी जोडला गेला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी