29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
HomeमुंबईLockdown21 : ‘बेस्ट’चा अजब कारभार, बिनकामाच्या प्रवाशांसाठी बसेस; कर्मचाऱ्यांना काम नसतानाही उपस्थितीची...

Lockdown21 : ‘बेस्ट’चा अजब कारभार, बिनकामाच्या प्रवाशांसाठी बसेस; कर्मचाऱ्यांना काम नसतानाही उपस्थितीची सक्ती

टीम लय भारी

मुंबई : लॉकडाऊनमध्ये ( Lockdown21 ) बस वाहतूक कशी सुरू ठेवावी याचे भान ‘बेस्ट’ प्रशासनाला आले नसल्याचे दिसत आहे. एका बाजूला गरजेपेक्षा जास्त गाड्या रस्त्यावर उतरविल्या जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला कारण नसतानाही चालक – वाहकांना कामावर बोलविले जात आहे.

डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पाणी – वीज कर्मचारी अशा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांकरीताच बस सुरू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तरीही ‘बेस्ट’च्या अधिकाऱ्यांनी गरज नसतानाही जास्तीच्या गाड्या रस्त्यावर उतरविल्या आहेत. लॉकडाऊनच्या ( Lockdown21 ) पहिल्या दोन दिवसांत तर मोठ्या प्रमाणात बसेस रस्त्यावर धावत होत्या. काहीही गरज नसताना अनेकजण घराबाहेर पडत आहेत. अशा बेफिकीर लोकांना ‘बेस्ट’च्या प्रवासामुळे फायदाच होत आहे.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कुणालाही ‘बेस्ट’चा प्रवास करण्यास मनाई करायला हवी. पण याचे पालन बेस्ट प्रशासनाकडून होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.  ‘लॉकडाऊन’च्या ( Lockdown21 ) पहिल्या दोन दिवसांत तर नवी मुंबईवरून मुंबईत येण्यासाठी रस्त्यावर बेस्ट बसेसच्या रांगा लागल्या होत्या. एवढ्या मोठ्या संख्येने बस कशासाठी रस्त्यावर उतरविल्या जात होत्या, असाही सवाल करण्यात येत आहे.

दुसऱ्या बाजूला, आवश्यकता नसतानाही वाहक – चालकांना कामावर बोलविले जात आहे. लॉकडाऊनच्या ( Lockdown21 ) काळात गर्दी करू नये असे सरकारचे आदेश आहेत. पण कामावर आलेल्या निम्म्यापेक्षा जास्त चालक – वाहकांना काम नाही. त्यामुळे या चालक – वाहकांना बस डेपोच्या विश्रांतीगृहात नाईलाजाने गर्दी करून थांबावे लागते. त्यामुळे ‘कोरोना’च्या महामारीमधील ‘सोशल डिस्टन्शिंग’चे पालन सुद्धा होत नाही.

‘बेस्ट’च्या अधिकाऱ्यांना ‘लॉकडाऊन’चे ( Lockdown21 ) नियोजनच करता आलेले नाही. बसेसची गरज किती आहे याचा अंदाज घेऊन त्यानुसार आवश्यक असतील तेवढ्याच चालक – वाहकांना कामावर बोलवायला हवे. पण तेवढे प्रशासकीय कौशल्य ‘बेस्ट’च्या अधिकाऱ्यांकडे नाही. अशा अधिकाऱ्यांमुळेच ‘बेस्ट’ची वाताहत सुरू असल्याचाही संताप या सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Corona Effect : राज्यातील ११ हजार आरोपी पॅरोलवर सुटणार

Corona effects : लॉकडाऊन काळात घरात बसण्यासाठी दूरदर्शनची ‘लय भारी’ शक्कल

Experts Say The U.S. Needs A National Shutdown ASAP — But Differ On What Comes Next

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी