विकास लवांडे
मी कोणत्याही मारहाणीचे अजिबात समर्थन करत नाही. या प्रकरणी जितेंद्रजी आव्हाड यांना जबाबदार धरण्याचा भाजपचा ( AwhadvsBJP) प्रयत्न आहे. त्याबाबत आव्हाड यांनी जाहीर स्पष्टीकरण दिलेले आहे. त्याबाबत मी अधिक बोलायची गरज वाटत नाही.
मी स्वतः तत्वतः अहिंसावादी आहे. मात्र अनंत करमुसे हा संघीष्ट व भाजपचा ( AwhadvsBJP ) कार्यकर्ता असावा. त्याच्या फेसबुकवरील पोस्ट जर वाचल्या, तपासल्या तर राज्यातील महत्वाच्या नेत्यांबाबत त्याने सामान्य कार्यकर्त्यांना अथवा कुणालाही चीड येईल अशा अश्लील व घाणेरड्या स्वरूपाच्या कॉमेंट्स व फोटो टाकले आहेत. कुणाचेही चारित्र्यहनन करणे हे खूनाच्या गुन्ह्यासारखा गुन्हा असतो. याबाबत भाजपने ( AwhadvsBJP) जबाबदारी घ्यावी.
असे अनेकजण सोशल मीडियात सतत घाणेरडे व चीड उत्पन्न होईल असे लिखाण व कॉमेंट्स करत असतात. मी अशा लोकांना ब्लॉक केले आहे. मलाही असे खालच्या भाषेत ट्रोल केले जाते. राजकीय वैचारिक ( AwhadvsBJP ) मतभेद जरूर असतात व आहेत. पण पातळी सोडून असभ्य भाषेत किंवा घाणेरडी टिंगलटवाळी सर्वजण सहन करू शकत नाहीत. इतरांनी यातून नक्की बोध घ्यावा असे वाटते.
हे सुद्धा वाचा
Coronavirus : मजूर कुटुंबातील चिमुकल्याने 10 हजार रुपये दिले मुख्यमंत्री निधीला
Covid19 : ‘कोरोना’ संसर्ग सहज टाळणे शक्य ( डॉ. सुहास सुर्यवंशी )