29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeराजकीयकाँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर; सचिन पायलट यांच उपोषण!

काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर; सचिन पायलट यांच उपोषण!

या वर्षी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पण, त्यापूर्वीच राज्यातील राजकारण तापले आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन आपल्याच सरकारविरोधात उपोषणाला बसले आहेत. पायलट यांच्या उपोषणाला पक्षश्रेष्ठींकडून विरोध होता.

कॉंग्रेससमध्ये विधानसभा निवडणूकीपुर्वीच पुन्हा एकदा राजकीय संकट निर्माण झाले आहे. कारण राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पायलट यांनी आपल्याच सत्ताधारी पक्षाविरोधात जयपूरमध्ये एकदिवसीय आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे काँग्रेससमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. दरम्यान आता काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी सचिन पायलट यांच्यावर कारवाई करणार की पायलट यांनी केलेल्या वसुंधरा राजे सरकारच्या कार्यकाळातील भ्रष्टाचारावर कारवाई करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

रविवारी जयपूरमध्ये माध्यमांशी बोलताना पायलट म्हणाले की, केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयसारख्या एजन्सीचा गैरवापर करत आहे आणि आमच्या काँग्रेस नेत्यांवर कारवाई केली जात आहे, परंतु राजस्थानमध्ये आमचे सरकार एजन्सीचा कोणताही वापर करत नाही. राजस्थानमध्ये 2018 च्या निवडणुकीपूर्वी भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली होती, परंतु आमचे सरकार सत्तेत आल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. यावरुन लोक वसुंधरा राजे आणि गेहलोत यांच्यात काही मिलीभगत असल्याचे म्हणू शकतात, असे पालयट म्हणाले.

दरम्यान, उपोषणस्थळी लावण्यात आलेल्या बॅनरवरुन काँग्रेस नेत्यांचे फोटो गायब झाले आहेत. विशेष म्हणजे, परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर राहुल गांधी आणि सोनिया यांच्यासोबत काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याचे फोटो नाहीत. पायलट यांच्या उपोषणासाठी हुतात्मा स्मारकावर स्टेज उभारण्यात आला असून, तिथे फक्त महात्मा गांधींचा फोटो लावण्यात आला आहे. पायलट यांच्या उपोषणात सामील होण्यासाठी राज्यभरातून समर्थक आले होते. यावेळी मंचावर पायलटभोवती काही माजी आमदार आणि तरुण चेहरेही दिसले आहेत. हा उपोषण संपल्यानंतर पायलट यांची पुढील रणनीती काय असेल यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

हे सुद्धा वाचा :

पवारांच्या वक्तव्यानंतर वंचितचा काँग्रेसच्या अदानीप्रकरणात जेपीसीच्या मागणीला पाठींबा

राहुल गांधींवरील कारवाईविरोधात काँग्रेसचा ब्लॅक प्रोटेस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचा पाय खोलात; राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्याने होणार तोटा !

पायलट यांच्यावर कारवाई करणे कठीण 

विशेषतः पायलट यांच्या या भूमिकेवर कारवाई करणे कॉंग्रेससाठी इतके सोप्पे नसणार आहे. पायलट यांचा राजकीय ग्राफ आणि तरूण मतदारांमधील प्रतिमा अधिक चांगली आहे. त्याच्यावर कारवाई करून कॉग्रेसला राजस्थानमधील भविष्यातील राजकीय वाटचाल अवघड करायची नाही आहे. त्याचप्रमाणे 25 डिसेंबर 2022 साली मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांच्या उपस्थितीत समांतर सभा घेतलेल्या गेहलोत यांच्या जवळच्या नेत्यांवर अनुशासनहीन कारवाई करण्यात आली नाही. शांती धारीवाल, पाणी पुरवठा मंत्री महेंद्र जोशी आणि धर्मेंद्र राठोड यांनी अनुशासन भंग केल्याबदद्ल नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अशात भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आंदोलनाला बसलेल्या पायलट यांच्यावर कारवाई करणे सोपे जाणार नाही.

Sachin Pilot, rajasthan congress, ashok gehlot, Sachin Pilot Protest against Rajasthan Congress Ashok Gehlot

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी