28 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeक्राईमहसन मुश्रीफ यांची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव

हसन मुश्रीफ यांची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी आज अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाने त्यांची अपील दाखल करून घेत त्यांना 27 एप्रिल पर्यंत अटक न करण्याचे आदेश ईडीला दिले आहे. यामुळे हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यांची पुढील सुनावणी 27 एप्रिल रोजी होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. विशेष PMLA कोर्ट न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी निर्णय दिला होता. मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायधीश एम जी देशपांडे यांनी मुश्रीफांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला आहे. मुश्रीफ यांच्यावर सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ईडी करत आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिस एन्काऊंटर : गॅंगस्टर अतीक अहमदच्या मुलाचा खात्मा

अजित पवारांवर होणार ईडीची कारवाई?

अविवाहित महिलेला मूल दत्तक घेण्यास मनाई केल्याबद्दल; उच्च न्यायालयाने ओढले ताशेरे

हसन मुश्रीफ यांच अपील दाखल झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.भागधारक शेतकऱ्यांची फसवणूक आणी मोठा आर्थिक घोटाळ्याचे मुश्रीफ सूत्रधार, हा ईडीनं केला आहे. मुश्रीफ यांच्या साजिद, आबीद आणी नावेद या 3 मुलांच्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर एक दोन दिवसात सुनावणी होणार आहे. याच न्यायाधीश देशपांडे यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी