29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeराजकीयबाळासाहेब थोरातांनी दोनच दिवसात पावसाळी अधिवेशन गाजवले

बाळासाहेब थोरातांनी दोनच दिवसात पावसाळी अधिवेशन गाजवले

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘विरोधी पक्ष कुठे आहे ते शोधावे लागेल’, अशी खोचक टिपण्णी केली केली होती. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा आवाज दिसणार का अशीच शक्यता होती मात्र ती फोल ठरली आहे, राष्ट्रवादी, शिवसेनेत फुट पडल्यानंतर देखील विरोधकांचा अधिवेशनात आवाज दिसून येत आहे. यात शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी तर दोनच दिवसात सरकारला विविध मुद्द्यांवर घेरत अधिवेशन गाजवले आहे.

गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे शिंदे-फडणवीस सरकारचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीचे अनेक आमदार त्यांच्यासोबत गेले. आठ जण मंत्री देखील झाले.

त्यामुळे विरोधीपक्षामध्ये मोठी पोकळी निर्मान झाली होती. विरोधकांचे खच्चीकरण होईल आणि सत्ताधाऱ्यांसमोर विरोधक टिकणार नाहीत अशीच अनेकांची भावना झाली होती. त्यामुळेच की काय एकनाथ शिंदे यांनी देखील ‘विरोधी पक्ष कुठे आहे ते शोधावे लागेल’ अशी टिका केली होती. मात्र अधिवेशन सुरु होताच काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) शिवसेना (ठाकरे गट) विधिमंडळात आक्रमक झाल्याचे दिसून आले. किरीट सोमय्या यांचे व्हिडीओप्रकरण, शेतकरी आत्महत्या, खते-बियाने वाटप, दुबार पेरणीचे संकट अशा अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला.

विरोधकांच्या काही प्रश्नांवर तर मंत्र्यांना उत्तरे देखील देता आली नाहीत, त्यामुळे ऐनवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सावरुन घ्यावे लागत आहे. विरोधी पक्षांमध्ये जरी फुट पडली असली तरी, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, नाना पटोले आदिंनी सभागृहात सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले आहे.

काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांची अधिवेशनात जोरदार चर्चा होत आहे. शांत, संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मात्र प्रश्नांचा नेमका वेध घेत त्यांनी सभागृहात छाप सोडली आहे. शेती संबंधीच्या प्रश्नावर चर्चा करताना काही खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते, काही मंत्र्यांचा अभ्यास कच्चा होता. त्यामुळे बाळासाहेब थोरात आक्रमक झाले. त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांचे याकडे लक्ष वेधले आणि मंत्री अभ्यास करुन सभागृहात येत नाहीत त्यांनी ताकीद द्या असे सांगितले. गोंधळलेल्या मंत्र्यांना सावरुन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री उभे राहून उत्तर देतात याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले. प्रत्येक प्रश्नाला उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर देणे योग्य नसल्याचे देखील थोरात म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मणिपूर महिला अत्याचाराच्या घटनेने देशात संतापाची लाट

जीएसटी कायद्यात दुरुस्तीचे विधेयक विधान सभेत मंजूर

विरोध होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला निर्णय

शिवसेनेत फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीत फुट पडली आहे, त्यामुळे विरोधीपक्ष क्षीण झाल्याचे बोलले जात असताना काँग्रसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळातील अनुभवी कामाचा झटका विरोधकांना दिला. शेती, बोगस खते- बियाने अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी विरोधी पक्षाच्या मंत्र्यांची बोलतीच बंद केल्याचे चित्र विधानसभेत गेल्या दोन दिवसात पहायला मिळाले.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी