28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रआम्हाला जीव द्यावा लागला तरी बेहत्तर; मुंबईसाठी जितेंद्र आव्हाड यांचा दिल्लीश्वरांना इशारा

आम्हाला जीव द्यावा लागला तरी बेहत्तर; मुंबईसाठी जितेंद्र आव्हाड यांचा दिल्लीश्वरांना इशारा

मुंबई शहराचा विकास आराखडा आता निती आयोग करणार असल्याचे वृत्त काल माध्यमांमध्ये आल्यानंतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. बुधवारी (दि.30) रोजी इंडिया आघाडी बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा केंद्राचा डाव असल्याबद्दल पुनरुच्चार केला. तर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने मुंबईतील हुतात्मा स्मारका समोर आंदोलन करुन केंद्राच्या या निर्णयाचा निषेध केला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटकरुन याबाबत सविस्तर पोस्ट लिहिली असून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. 105 हुतात्म्यांच्या बलिदानावर ती महाराष्ट्रासोबत उभी आहे. देशात इतर कोणत्याही शहरापेक्षा सर्वाधिक कर भरणारी महापालिका अशी तिची ओळख आहे. काल बातमी आली की, यापुढे मुंबईचा आराखडा, निती आयोग तयार करणार. मुळात निती आयोगाचं काम हे देशाचा आराखडा बनवण्याच आहे. त्यांनी एखाद्या राज्याच्या राजधानीचा आराखडा बनवण्याच काम करण्याचं कारण काय..? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

आव्हाड यांनी म्हटले आहे की, मुंबई दिल्लीप्रमाणे केंद्रशासित नाही, तरी देखील निती आयोग मुंबईचा आराखडा बनविण्याचा डाव केंद्र सरकारने आखला आहे. याचा सरळ अर्थ मुंबई केंद्रशासित करण्याचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबई महाराष्ट्रात रहावी म्हणून 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले. कित्तेक नेते तुरुंगात गेले, त्यामुळे आज मुंबई महाराष्ट्रात आहे. आमची दूसरी पिढी कोणत्याही परिस्थितीत मुंबईला राज्यापासून तोडू देणार नाही, भले आम्हाला जीव द्यावा लागला तरी बेहत्तर, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

संपूर्ण जगात मराठी माणसाची मान खाली जाईल, म्हणून हा लचके तोडण्याचा प्रकार केंद्र सरकार मुंबई सोबत करत आहे. मात्र या मायभुमिचे लचके तोडण्याच काम आम्ही कोणत्याही कोल्ह्यांना, लांडग्यांना आम्ही करू देणार नाही. असे म्हणत आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. या लोकांच्या संमतीने या राज्याचे लचके तोडण्याच काम बिनबोभाट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच सत्तेसाठी तुम्ही दिल्लीश्वरांना शरण गेला आहात त्यामुळे एकही शब्द या निर्णयाविरोधात निघत नसल्याचे आव्हाडांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा 
बदला घेण्यासाठी मी शाहरुख सोबत काम केलं, ‘जवान’ मधील या कलाकाराचा गौप्यस्फोट
अदानी यांच्या गुंतवणुकीतला पैसा कुणाचा? राहुल गांधी यांचा मोदींना थेट सवाल
दीपिका पाडूकोणला ‘या’ कलाकारानं पाठवला मेसेज, दीपिकाची रिएक्शन काय? 

आव्हाड पुढे म्हणतात की, मला खात्री आहे मराठी माणूस केंद्राचा हा मनसुबा यशस्वी होऊ देणार नाही. मग त्यासाठी पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारावा लागला तरी बेहत्तर..! त्यामुळेच आज राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत हुतात्मा चौकात आंदोलन केले असून राज्य सरकार तथा केंद्र सरकारला इशारा देण्यात आला की, मुंबई तोडण्याच स्वप्न देखील बघू नका.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी