29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपा सरकारबरोबर जाण्याचे अजित पवार यांनी सांगितले खरे कारण.... काय म्हणाले उपमुख्यमंत्री?

भाजपा सरकारबरोबर जाण्याचे अजित पवार यांनी सांगितले खरे कारण…. काय म्हणाले उपमुख्यमंत्री?

साखर कारखाना चालवतात त्यांना इन्कम टॅक्सच्या नोटीसा येत होत्या. शेतकऱ्यांच्या एफआरफीवर त्याचा परिणाम होत होता. त्यासाठी कितीतरी वेळा दिल्लीला आम्ही गेलो परंतु काही उपयोग झाला नाही. मात्र आता आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो आणि तो प्रश्न सुटला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महायुतीत गेलो तर चुकलं कुठे? असे खरेखुरे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी कोल्हापूर येथील उत्तरदायित्व सभेत दिले. अजित पवार यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांवर इडीची टांगती तलवार होती. यासाठी ते भाजपा बरोबर गेल्याचा आरोप होत असे. मात्र अजित पवार यांनी जाहीररीत्या त्याची कबुली दिली आहे.

आमच्यावर दबाव होता अशी टीका केली जाते… होय आमच्यावर दबाव होता…. पण लोकांची कामे पूर्ण करण्यासाठी… आमदारांच्या कामांवर स्थगिती आली होती. ती काढावी म्हणून दबाव होता… आम्ही दबावाला बळी पडणारे नाही… माझी शेतकऱ्याची औलाद आहे. जे बोलतो ते खरे बोलतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना सज्जड इशारा दिला.

कायदा व सुव्यवस्था चांगली रहावी. जातीय सलोखा बिघडू नये म्हणून यासाठी काम करत आहोत. ३१ मार्च २०२४ पर्यंत शिवाजी विद्यापीठाला पैसे मिळतील असे आश्वासन देतानाच भाषणात सांगून कामे मिळत नाही. त्यासाठी आयटी कंपनी इथे येतील असे वातावरण तयार करा असे आवाहन केले व यासंदर्भात बैठक घेतली आहे. राज्याचा सर्वांगिण विकास कसा होईल आणि त्या त्या भागातील काम पूर्ण कसे होईल असा प्रयत्न केला जात आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

काही लोकांना अनुदान मिळाले नाही. जेवढे वंचित राहिले आहेत त्यांची यादी द्या सहकारमंत्री यांच्याकडे द्या ती यादी पुरवण्या मागण्यात घेईन असेही अजित पवार म्हणाले.

स्वार्थासाठी आम्ही महायुतीत गेलो नाही तर लोकांच्या कामाचा दबाव होता. माझे सर्व लोकांची कामे करणारे सहकारी आहेत म्हणून आम्ही सत्तेत सहभागी झालो. संधी मिळाल्यावर लोकांची कामे केली पाहिजे लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत त्यासाठी आम्ही सत्तेत गेलो. उद्धव ठाकरे यांचे सरकार पडणार होते त्यावेळी सर्व आमदारांनी महायुतीत सहभागी व्हा असे पत्र दिले. हे खोटे असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन. आहे तयारी का? असे जाहीर आव्हान अजित पवार यांनी दिले.

हल्ली कोण पण उचलली जीभ लावली टाळ्याला अशा पध्दतीने टीका करतात. विचारांची लढाई लढली पाहिजे. विरोधाला विरोध ही माझी पध्दत नाही तो माझा स्वभाव नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा 

कल्याण -डोंबिवलीचे राजकारण कूस बदलणार; खासदारकीसाठी कथोरे चर्चेत, महापौर पदावर भाजपचा डोळा

भाजपचा आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या मुलाला देणार टक्कर ?

मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात बनावट पनीरचा धंदा तेजीत!

मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सध्या चर्चेत आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावता कामा नये. काही मराठा मंत्री झाले परंतु याच समाजातील हलकी कामे करत आहे. गरीब आर्थिकदृष्ट्या आहे त्याला आरक्षण मिळाले पाहिजे. जरांगे यांना सांगत आहोत ते ऐकत नाहीत. असेही अजित पवार म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी