29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रशहीद जवानाच्या पत्नीचे भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे, अधिकाऱ्यांच्या असहकार्याने सर्वसामान्य हैराण!

शहीद जवानाच्या पत्नीचे भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे, अधिकाऱ्यांच्या असहकार्याने सर्वसामान्य हैराण!

आकाश दडस, बिदाल: माण तालुक्यातील जाशी गावचे सुपुत्र चंद्रकांत गलांडे हे सात वर्षांपूर्वी भारतीय सेनेमध्ये सेवेत शहीद झाले आहेत. त्यांच्या पत्नी श्रीमती निशा गलांडे यांना राणंद येथे शासकीय जमीन मिळाली आहे. मात्र गट नंबर ११६१ या जमिनीची कब्जेपट्टी प्रमाणे विभक्त सातबारा करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून दहिवडी येथे भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारत असल्याची माहिती समोर आली आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर जनता नाराज आहे. याबाबतची अधिक माहिती अशी आहे की श्रीमती निशा चंद्रकांत गलांडे यांना सरकारी जमिन मिळाली आहे. सदर जमिनीचे कब्जेपट्टीप्रमाणे विभक्त सातबारा या कामासाठी भूमी अभिलेख कार्यालयात त्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

यावेळी वीरपत्नी निशा गलांडे म्हणाल्या, “शहीद पत्नीला प्रशासन व शासकीय अधिकारी अजिबात सहकार्य करत नाहीत. मुलांच्या शिक्षणाच्या कामानिमित्त मी पुण्यात राहते. दहिवडी येथे शासकीय तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय, अभिलेख कार्यालयात गेल्या दोन वर्षापासून हेलपाटे मारत आहे. मात्र प्रत्यक्ष न्याय अजूनही मिळत प्रशासनांकडून न्याय न मिळाल्यास सातारा येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.”

“दहिवडी येथे भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारी व कर्मचारी सातत्याने गैरहजर असतात. कर्मचारी मला अजिबात सहकार्य करत नाहीत. या भागातील लोकप्रतिनिधी मला शासकीय कामात सहकार्य करत नाहीत.माजी सैनिक व भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेल्या सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय कामानिमित्त अनेकदा हेलपाटे मारून न्याय मिळत नाही,” त्या पुढे म्हणाल्या.

हे ही वाचा

एफडीए झाला ओसाड गावचा पाटील

मुख्यमंत्र्यांचे आदेश येताच जिल्हा प्रशासन जागे झाले; जिल्हाधिकाऱ्यांची मध्यरात्री आरोग्य केंद्रांना अचानक भेट

मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या गाड्यांसाठी विधानभवनात भेदभाव !

जाशी गावालगतच्या शेतात चंद्रकांत गलांडे यांची स्वतंत्र वस्ती असून तिथे चंद्रकांत यांचे वडील शंकर, आई सुलाबाई, पत्नी निशा, मुलगा श्रेयस आणि जय असे कुटुंब कायम राहते. चंद्रकांत हे २००४ मध्ये ते लष्करात भरती झाले होते. ते आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये देशसेवा करत होते. चंद्रकांत यांचे लग्न २१ नोव्हेंबर २०११ रोजी झाले. काश्मीर खोऱ्यात लान्स नायक चंद्रकांत गलांडे हे ३० सप्टेंबर २०१७ रोजी शहीद झाले आहेत.

सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. जिल्ह्यातील हजारो तरुण भारतीय सैन्यात आपले कर्तव्य बजावत असून भारतीय सैन्यात दाखल होण्यासाठी जिल्ह्यातील हजारो तरुण सैन्य भरतीत सहभागी होत असतात. माण तालुक्यातील जाशी येथील तब्बल २० जवान देशाचे रक्षण करत आहेत. या छोट्याशा गावातून तब्बल वीस सुपुत्र देशसेवेत भरती झाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी