29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबईअजितदादांच्या 'टोपी'ची हवा; जोडला अखंड महाराष्ट्र माझा !

अजितदादांच्या ‘टोपी’ची हवा; जोडला अखंड महाराष्ट्र माझा !

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनी पक्ष संघटना बळकट करण्याचे काम हाती घेतले आहे. अजितदादांच्या पोषाखाची नेहमीच चर्चा होते. आज कळवण दौऱ्यावर आल्यानंतरदेखील एका गोष्टीने लक्ष वेधले. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार यांचे गांधी टोपी घालून स्वागत केले. या व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अजित पवार यांच्या पोषाखाची नेहमीच चर्चा होत असते. पांढरा कुर्ता, जॅकेट हा त्यांचा नेहमीचा पोषाख असतो. कपडे आणि स्वच्छता याबाबतीत अजित पवार अत्यंत काटेकोर असतात. सहकाऱ्यांना देखील ते पोषाख आणि स्वच्छतेच्या बाबतीत सूचना करतात.

अजित पवार यांचे नेतृत्व घडले ग्रामीण भागात. ग्रामीण महाराष्ट्रात बहुजन समाजात गांधी टोपी सर्रास वापरली जाते. वारकरी सांप्रदायात वारकरीदेखील प्रतिक म्हणून गांधी टोपी वापरतात. संतपरंपरेची विचारधारा सांगणारी, गांधी, बहुजनांची विचारधारा सांगणारी गांधी टोपी अजित पवारांच्या डोक्यावर दिसू येते. कोल्हापूर सभेच्या दौऱ्यावेळी देखील अजित पवार यांनी गांधी टोपी घातली होती. आज नाशिक कळवण दौऱ्यात देखील अजित पवार यांनी गांधी टोपी घातली.

एकेकाळी दिल्लीत याच गांधी टोपीवरुन महाराष्ट्रातील नेत्यांची ओळख व्हायची. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब विखे-पाटील या जुन्या पिढीतील काँग्रेस नेते गांधी टोपी वापरत असत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरु देखील गांधी टोपी वापरत असत. राज्यातील सर्वसामान्य बहुजनवर्ग आज देखील गांधी टोपी वापरतो.

मुंबईतील डबेवावालेही गांधी टोपी घालत असतात. ब्रिटनचा प्रिन्स जेव्हा मुंबईत आला होता तेव्हा त्याला गांधी टोपी भेट देण्यात आली होती. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्तेही गणपती आगमन आणि विसर्जन कालावधीत गांधी टोपी आणि पांढरा शर्ट आणि कुर्ता परिधान करतात.

हे सुद्धा वाचा 

ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाची चर्चा पोहचली दिल्लीत
शहीद जवानाच्या पत्नीचे भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे, अधिकाऱ्यांच्या असहकार्याने सर्वसामान्य हैराण!
एफडीए झाला ओसाड गावचा पाटील

अरुण गवळी हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला माणूस. एकदा आमदार झाला. ऑन त्यानेही आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात गांधी टोपीला प्राधान्य दिले आहे. हिन्दी आणि मराठी चित्रपट सृष्टीत राजकारणी आणि काही गुंडांनाही गांधी टोपीत आपण पाहिलेले आहे.

ग्रामीण महाराष्ट्राचे प्रतिक असलेली ही टोपी अजित पवार वापर करत असल्याचे दिसत आहे. त्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गट यांच्यामध्ये सध्या पक्ष चिन्ह आणि नावावरून वाद सुरू झाला असून हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले आहे. त्यामुळे आपोआप शरद पवार यांना थेट आव्हान देणाऱ्या अजित पवार यांनी देशाचे राजकारण व्यापायला सुरुवात केली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी