27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकचे शेतकरी आंदोलन सुरूच

नाशिकचे शेतकरी आंदोलन सुरूच

जिल्ह्यातील आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहिल्याने मागण्यांवर मंगळवारी तोडगा निघू शकला नाही. त्यामूळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचा मुक्काम वाढला आहे. शिष्टमंडळ परतल्यानंतरच गावी परतायचे की येथेच थांबून राहायचे याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून हजारोंच्या संख्येने शेतकरी पायी मोर्चाद्वारे सोमवारी (दि.२६) दुपारी शहरात दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्यावर या आंदोलकांनी ठिय्या मांडला. यामूळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुक व्यवस्था कोसळली आहे. आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या समितीने आंदोलकांच्या शिष्टमंडळाची मंगळवारी (दि. २७) मुंबईत मंत्रालयात बैठक बोलावली होती.

जिल्ह्यातील आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहिल्याने मागण्यांवर मंगळवारी तोडगा निघू शकला नाही. त्यामूळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचा मुक्काम वाढला आहे. शिष्टमंडळ परतल्यानंतरच गावी परतायचे की येथेच थांबून राहायचे याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून हजारोंच्या संख्येने शेतकरी पायी मोर्चाद्वारे सोमवारी (दि.२६) दुपारी शहरात दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्यावर या आंदोलकांनी ठिय्या मांडला. यामूळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुक व्यवस्था कोसळली आहे. आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या समितीने आंदोलकांच्या शिष्टमंडळाची मंगळवारी (दि. २७) मुंबईत मंत्रालयात बैठक बोलावली होती. बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, माजी आमदार जे. पी. गावित यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवारी सकाळीच बैठकीकरीता हे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले. दुपारी दीड वाजता ही बैठक होणार होती. परंतु विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने बैठकीला विलंब झाला. सायंकाळी साडेसहाला सुरू झालेली बैठक रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. त्यामुळे आंदोलन थांबवायचे की पुढे सुरूच ठेवायचे याचा निर्णय लांबणीवर पडला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी