27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपला शिवरायांच्या नावाची ॲलर्जी,  राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार

भाजपला शिवरायांच्या नावाची ॲलर्जी,  राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार

टीम लय भारी

जालना : खासदार उदयनराजे यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेतले म्हणून राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडूंनी आक्षेप घेतला. त्यावर शिवप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही ( NCP will be agitated against BJP )  आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.

‘जय शिवाजी, जय भवानी’ असे लिहून २० लाख पत्रे व्यंकय्या नायडू यांना पाठवणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जगन्नाथ काकडे – पाटील यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले ( NCP will send 20 lakhs letters to Venkaiah Naidu ).

Mahavikas Aghadi

राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपने शरद पवारांना १० लाख पत्रे पाठविण्याचा इशारा दिला होता ( BJP going to send 10 lakhs letters to Sharad Pawar). त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवरायांच्या मुद्द्यावर नायडू यांना २० लाख पत्रे पाठविणार असल्याचे काकडे – पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

उदयनराजेंनी शिवरायांच्या वंशज असल्याचे पुरावे आणावेत; राऊतांनी डिवचले

उदयनराजे,गादीचे वारस आणि रक्ताचे नाते हे वेगळे असते; मलिकांचा टोला

उदयनराजेंकडून पगडी घालून घेतात, अन् आम्हाला टोप्या लावतात : उद्धव ठाकरे यांची मोदी, शाहांवर टीका

यापूर्वी भाजपचे खासदार व मंत्री यांना शपथ घेताना अनेकदा नमो… नमो, जय श्रीराम, नरेंद्र मोदी यांच्या घोषणा दिल्या आहेत. त्यावर लोकसभा अध्यक्ष किंवा राज्यसभा सभापती यांनी कधीही आक्षेप घेतला नाही. मात्र उदयनराजे यांनी शपथेचा समारोप करताना ‘जय शिवाजी, जय भवानी’ असा उल्लेख केला ( Venkaiah Naidu objected on Udyanraje Bhosle ) तर नायडू यांना लगेच मिरच्या का झोंबल्या असा सवाल काकडे यांनी केला.

शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक करण्यासाठी ब्राह्मणांनी विरोध केला होता. आता भाजपचे ब्राह्मण शिवरायांचे नाव घ्यायलाही विरोध करू लागल्याचा आरोप त्यांनी केला.

Laybhari appeal

शपथेमध्ये शिवरायांचे नाव घेतले अन् ते नोंद झाले तर त्यामुळे काय बिघडणार आहे. मुळातच शिवाजी महाराजांना आदर्श माणून राज्य कारभार चालविला गेला पाहीजे. पण संसदेच्या पवित्र ठिकाणीही नाव घ्यायला मज्जाव केला जात असेल तर भाजपची नियत साफ नाही असेच दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी