30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजVIDEO : भाजपच्या आमदारांसमोर राष्ट्रवादीच्या आमदाराचे आंदोलन

VIDEO : भाजपच्या आमदारांसमोर राष्ट्रवादीच्या आमदाराचे आंदोलन

टीम लय भारी

नागपूर : भाजपचे काही आमदार विभागीय आयुक्त कार्यालयात आले होते. या आमदारांच्या समोरच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी घोषणाबाजी केली (Narendra Modi and the BJP are pretending ). 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप पक्ष ढोंगीपणा करीत आहे. खोटी माहिती देवून लोकांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप करीत गजभिये यांनी घोषणाबाजी केली  ( NCP former MLC Prakash Gajbhiye agitated against Narendra Modi government ).

Narendra Modi and the BJP are pretending
नरेंद्र मोदी ढोंगीपणा करीत असल्याचा आरोप गजभिये यांनी केला आहे

यावेळी भाजपचे काही आमदार तिथे उपस्थित होते. भाजप आमदारांच्या समोरच गजभिये यांनी घोषणाबाजी केल्यामुळे पाहणाऱ्यांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले ( Prakash Gajbhiye agitatied front of BJP MLA ).

संसेदत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सोमवारी नरेंद्र मोदी ( Narendra Modi speech ) आपले उत्तर दिले. कृषी कायद्याला शरद पवार यांचे समर्थन होते असे खोटे वक्तव्य केल्याचा आरोप करीत गजभिये यांनी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात घोषणाबाजी केली ( Narendra Modi said, Sharad Pawar has positive for Farmers law ).

हे सुद्धा वाचा

राज्यपालांचा आडमुठेपणा, 12 आमदारांच्या नियुक्तीमध्ये कोलदांडा : काँग्रेसचे टीकास्त्र

नरेंद्र मोदींच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की : बाळासाहेब थोरातांचे टीकास्त्र

संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना दिल्या ‘या’ शुभेच्छा; म्हणाले…

PM Narendra Modi appeals farmers to end protest, says ‘give chance to Agri reforms’

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य जीएसटीच्या माध्यमातून सर्वाधिक निधी केंद्राला देत असते. जीएसटीतील महाराष्ट्राच्या वाट्याचे तब्बल 28 हजार कोटी रुपये मोदी सरकारने थकविले आहेत ( Narendra Modi government hol 28 corer of Maharashtra ). त्यामुळे महाराष्ट्रातील विकासकामे रखडली आहेत. केंद्राने हा थकीत निधी त्वरीत राज्याला द्यावा, असेही गजभिये यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे भाव प्रचंड वाढविले असून गोरगरिबांची चूल पेटवणारे गॅस सिलेंडर त्याचेही भाव मोठ्या प्रमाणात वाढविले आहेत.

केंद्रातील भाजप सरकारने आंदोलक शेतकऱ्यांची ( Farmers Protest ) ७० दिवस अडवणूक केली आहे. त्यामुळे १०० हून अधिक शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला. पंतप्रधान मोदीजी, हे लोकतंत्र आहे का ?

– प्रकाश गजभिये

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना शेतकरी मुद्द्यांना हात घातला. पण नेहमीप्रमाणे स्वतःचीच टिमकी वाजवली. दिल्लीच्या वेशीवर ७० हून अधिक दिवस आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा चर्चेला या, मी चर्चेसाठी तयार आहे, अशी पुडी सोडली.

नरेंद्र मोदी यांनी ७० दिवसानंतरही चर्चेसाठी पुढाकार घेतलेला नाही. उलट आज भाषण करताना भारतातील लोकशाही कशी चांगली आहे आणि आणीबाणीच्यावेळी लोकशाहीची कशी गळचेपी झाली होती, यावर प्रवचन दिले. पण शेतकऱ्यांविषयी अवलंबलेली भूमिका ते सोयीस्करपणे विसरले ( Narendra Modi given wrong information in Parliament ).

दिल्लीच्या वेशीवर आंदोलन ( Farmers Protest ) करताना १०० हून अधिक शेतकऱ्यांचे प्राण गेले ( More 100 Farmers died at Delhi ). दिल्लीच्या रस्त्यावर खिळे ठोकले. आंदोलनकर्त्यांचे पाणी, वीज तोडली. हरियाणातील नवदीप कौर नावाच्या दलित महिला पत्रकाराला बेकायदेशीर अटक करुन तिच्यावर अत्याचार केले, हा कोणत्या लोकशाहीचा भाग आहे? लोकशाहीत आंदोलनाचा मार्ग वापरण्याचा लोकांचा घटनात्मक अधिकार आहे. मग अशा टोकाच्या मार्गांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काय म्हणायचे ? याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यायला हवे, असेही गजभिये यांनी ठणकावले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी