30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रआमदार जयकुमार गोरे यांच्यामुळं भाजप सापडला संकटात

आमदार जयकुमार गोरे यांच्यामुळं भाजप सापडला संकटात

आमदार जयकुमार गोरेंमुळे अख्खा भाजप कसा अडचणीत आलाय, हे मी सांगणार आहे. हे सांगण्यापूर्वी मला तुम्हा प्रेक्षकांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर करायची आहे. गुगलचा ‘गुगल न्यूज इनिसिएटिव्ह’ हा देशपातळीवरचा फार मोठा उपक्रम आहे(MLA Jaykumar Gore brought BJP in trouble). या उपक्रमासाठी गुगलने गेल्या वर्षी आमच्या ‘लय भारी’ची निवड केली होती.

आमदार जयकुमार गोरेंमुळे अख्खा भाजप कसा अडचणीत आलाय, हे मी सांगणार आहे. हे सांगण्यापूर्वी मला तुम्हा प्रेक्षकांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर करायची आहे. गुगलचा ‘गुगल न्यूज इनिसिएटिव्ह’ हा देशपातळीवरचा फार मोठा उपक्रम आहे(MLA Jaykumar Gore brought BJP in trouble). या उपक्रमासाठी गुगलने गेल्या वर्षी आमच्या ‘लय भारी’ची निवड केली होती.

आमदार जयकुमार गोरे यांनी बिजवडी-येळेवाडी रस्त्याच्या कामाचे श्रेय घेऊ नये : प्रशांत विरकर

गुगलच्या या महत्वकांक्षी योजनेत स्थान मिळविणारे ‘लय भारी’ हे पहिलेच एकमेव मराठी पोर्टल होते. याचा केवळ आम्हालाच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी आम्ही करू शकलो होतो. आता यंदा पुन्हा गुगलने ‘लय भारी’ला ‘गुगल न्यूज इनिसिएटिव्ह’ या उपक्रमात सामावून घेतले आहे. आमच्यासह एकूण २४ मराठी न्यूज पोर्टल्सनी या उपक्रमात स्थान मिळविलंय. देशभरातून एकूण ३५० न्यूज पोर्टल्सनी या उपक्रमात स्थान मिळवलंय.

आमदार जयकुमार गोरे यांच्यामुळं भाजप सापडला संकटात

या उपक्रमाअंतर्गत गुगलकडून ज्ञान, तंत्रज्ञान, प्रशिक्षण व घसघशीत अनुदान दिलं जातं. आम्ही आता जी काही धारदार पद्धतीने पत्रकारिता करीत आहोत, ती केवळ गुगलच्या उपकारामुळंच. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील डिजिटल पत्रकारितेसाठी वरवंटा ठरलेले आहेत, अशा परिस्थितीत गुगलने आमच्या पत्रकारितेला उत्तेजन देण्यासाठी दिलेली ताकद ही कधीही न विसरता येण्यासारखी आहे. त्यांनी पत्रकारितेसाठी ताकद दिली नसती तर असे व्हिडीओ आम्ही तयारच करू शकलो नसतो. गुगलने आम्हाला जशी ताकद दिली तशी ताकद मायबाप प्रेक्षक व वाचकांनीही द्यावी. म्हणूनच आपण आमचा यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावा, फेसबूक पेज फॉलो व लाईक करावे, अशी आम्ही आपणांस विनंती करतो.

जयकुमार गोरे यांना वाळू चोरीचा कळवळा की, पायाखालची वाळू सरकली ?

तर मी जयकुमार गोरे यांच्याविषयी बोलत होतो. जयकुमार गोरे हे माण – खटाव या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदारसंघात डॉ. एम. आर. देशमुख नावाच्या एका उच्च विद्याविभूषीत व्यक्तीनं वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्न असे रूग्णालयं सुरू केलं होतं. महाविद्यालय नवीनच होतं. सुरूवातीला काही छोट्या मोठ्या चुका झाल्या. त्यामुळं हे महाविद्यालय व रूग्णालय अडचणीत आलं. डॉ. देशमुख ही व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ होती. ते पूर्वांपार भाजपचेच कार्यकर्ते होते. पण त्यांना राजकीय छक्केपंजे काहीच माहित नव्हते. त्याचाच गैरफायदा जयकुमार गोरे यांनी उचलला. त्यावेळी जयकुमार गोरे कॉंग्रेसमध्ये होते. गोरे यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संधान साधलं. जयकुमार गोरे कुठल्या अटीवर भाजपमध्ये गेले, याची अख्ख्या माण – खटाव मतदारसंघामध्ये आजही चर्चा होत असते. डॉ. देशमुख यांनी उभं केलेलं महाविद्यालय मला द्या, मी भाजपमध्ये येतो, अशी गोरे यांनी मागणी केली. गोरे यांना पतंगराव कदम यांच्यासारखं शिक्षणसम्राट व्हायचं होतं. फडणवीस व तत्कालिन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी हे महाविद्यालय जयकुमार गोरे यांच्या घशात घालण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी केल्या.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी