30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रJaykumar Gore | असल्या आमदाराला जाळायचंय का ? | महिलेचा आक्रोश |...

Jaykumar Gore | असल्या आमदाराला जाळायचंय का ? | महिलेचा आक्रोश | Devendra Fadanvis

आमदार जयकुमार गोरे यांच्यावर म्हसवड परिसरातील जनता प्रचंड संपप्त आहे(The people of Mhaswad area are very upset with MLA Jayakumar Gore). म्हसवड परिसरातील ५१०० हेक्टर म्हणजेच जवळपास १२५०० एकर जमीन सरकारने अधिगृहीत केली आहे. याशिवाय जयकुमार गोरे यांनी गुलाब उगल मुगले या तलाठ्याच्या माध्यमातून ७०० एकर जमीन वेगवेगळ्या लोकांच्या नावाने खरेदी करून ठेवलेली आहे. केंद्र सरकारचा भलामोठा बंगळुरू – मुंबई औद्योगिक प्रकल्प या ठिकाणी येणार आहे.

आमदार जयकुमार गोरे(Jaykumar Gore) यांच्यावर म्हसवड परिसरातील जनता प्रचंड संपप्त आहे(The people of Mhaswad area are very upset with MLA Jayakumar Gore). म्हसवड परिसरातील ५१०० हेक्टर म्हणजेच जवळपास १२५०० एकर जमीन सरकारने अधिगृहीत केली आहे. याशिवाय जयकुमार गोरे यांनी गुलाब उगल मुगले या तलाठ्याच्या माध्यमातून ७०० एकर जमीन वेगवेगळ्या लोकांच्या नावाने खरेदी करून ठेवलेली आहे.

जयकुमार गोरे म्हणतात, आम्ही विरोधकांना तुरूंगात टाकू; विरोधकांनीही दिले खणखणीत उत्तर !

केंद्र सरकारचा भलामोठा बंगळुरू – मुंबई औद्योगिक प्रकल्प या ठिकाणी येणार आहे. पण या प्रकल्पात मोठा जमीन घोटाळा झाला आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सरकारने सातबाऱ्यांवर शिक्के मारले आहेत. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. या पार्श्वभूमीवर लय भारीने तळागाळात जावून लोकांच्या भावना जाणून घेतल्या. महिला, वृद्ध, तरूण अशा सगळ्यांनीच या प्रकल्पाच्या विरोधात दंड थोपटले आहेत. या प्रकल्पग्रस्तांमधील बहुतांश जनता यांनी जयकुमार गोरे यांना मतदान केलेले आहे. आमचेच मतदान घेवून जयकुमार गोरे यांनी आमचंच वाटोळं केलं. असा आरोप येथील शेतकरी करीत आहेत. आमदार जयकुमार गोरे यांच्या भ्रष्टाचाराविरोधात ‘लय भारी’ने जोरदार मोहिम हाती घेतली आहे.

VIDEO : आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला मोठा अपघात

माण – खटावमध्ये जयकुमार गोरे यांनी अनेक भ्रष्टाचार केले आहेत. जयकुमार गोरे यांचा नवा भ्रष्टाचार ‘लय भारी’च्या हाती आला आहे. जयकुमार गोरे यांनी बेनामी पद्धतीने तब्बल ७०० एकर जमीन हडपली आहे. यातील बहुतांश जमीन ही धनगर समाजाची आहे. याच ठिकाणी अजित पवार यांच्या निकटवर्तियांनी सुद्धा साधारण ४०० एकर जमीन हडपल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात यांना सांगितले. तुषार खरात यांनी घटनास्थळी जावून शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. जयकुमार गोरे याच्या वतीने तलाठी गुलाब उगल मुगले व सर्कल अकडमल हे दोघेजण जमीनीचे व्यवहार करीत असतात. हे महसूल खात्याचे कर्मचारी कमी आणि जयकुमार गोरे यांचे दलाल म्हणून जास्त काम करतात. ज्या शेतकऱ्यांची २२ एकर जमीन जयकुमार गोरे याच्या वतीने मुगले याने आपल्या मावशीच्या नावाने खरेदी केली आहे. या जमिनीचे प्रकरण न्यायप्रवीष्ठ असतानाही मुगले याने हा प्रकार केला आहे. ही जमीन जावू नये म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना १८ दिवस तुरूंगात डांबण्यात आल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले.

VIDEO : जयकुमार गोरे यांचा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर घाव !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी