26 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरव्हिडीओVIDEO : जयकुमार गोरे यांचा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर घाव !

VIDEO : जयकुमार गोरे यांचा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर घाव !

जयकुमार गोरे यांचा रामराजे नाईक निंबाळकरांवर घाव !
सातारा जिल्ह्यात होऊ घातलेला ‘बंगळुरू मुंबई औद्योगिक कॉरिडॉर’ प्रकल्प नक्की कुठे उभारायचा यावरून जोरदार रणकंदन सुरू आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या पंटरांच्या नावावर जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. त्यामुळे त्यांना हा प्रकल्प स्थलांतरीत करायचा आहे, असा आरोप भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी केलाय.
म्हसवडची MIDC कुठेही जाऊ देणार नाही, असंही जयकुमार गोरे यांनी ठासून सांगितलंय. पण म्हसवडच्या जनतेला MIDC नकोय. तिथं ‘बंगळुरू – मुंबई औद्योगिक कॉरिडॉर’ हवाय. MIDC आणि कॉरिडॉर या दोन्हींमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. परंतु अपुऱ्या अभ्यासामुळे जयकुमार गोरे यांना या दोन्हींमधील फरक लक्षात येत नसल्याचं त्यांच्या बडबडीवरून दिसतंय.

सातारा जिल्ह्यासाठी मंजूर झालेला ‘बंगळुरू – मुंबई औद्योगिक कॉरिडॉर’ हा प्रकल्प कोणत्या ठिकाण सुरू करायचा यावरून सध्या जोरदार रणकंदन सुरू आहे. हा प्रकल्प म्हसवड येथे सुरू करण्याबाबत ‘महाविकास आघाडी’ सरकारच्या काळात निर्णय झाला होता. त्याबाबतची अधिसूचना सुद्धा जारी झाली होती. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर येताच त्यांनी हा निर्णय फिरवला. सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव परिसरात हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतला. या निर्णयामुळे म्हसवड परिसरातील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!