26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeराजकीयमोदी सरकार नेस्तनाबूत होईल : बाळासाहेब थोरातांचा निशाणा

मोदी सरकार नेस्तनाबूत होईल : बाळासाहेब थोरातांचा निशाणा

टीम लय भारी

कोल्हापूर :  नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी व कामगारांचे वाटोळे केले आहे. मोदी सरकार केवळ धनदांडग्यांचाच विचार करीत असते. त्यामुळे कामगार व शेतकरी मोदी सरकारला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी संतप्त भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली ( Balasaheb Thorat scathing to Narendra Modi government ).

शेतकरी कायद्यांविरोधात काँग्रेसच्या वतीने आज कोल्हापूरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोदी सरकारवर थोरात यांनी जोरदार हल्ला चढवला. या आंदोलनाच्या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार राजू आवळे, आमदार ऋतूराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते ( Tractor rally organized at Kolhapur by Maharashtra Congress ).

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब थोरातांनी ठणकावले : मोदी सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस संघर्ष करणार

SpeakUpForFarmers : बाळासाहेब थोरातांनी मोदी सरकारवर डागली तोफ, कायदे रद्द होईपर्यंत केंद्र सरकारविरोधात संघर्ष करणार

Hathras Case : संवेदनाहीन उत्तर प्रदेश सरकारचा हाथरस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न: बाळासाहेब थोरात

पृथ्वीराज चव्हाणांची भूमिका : ‘महाविकास आघाडी’ सरकारने राजस्थान, पंजाबचे अनुकरण करावे

फडणवीस सरकारनं अर्णब गोस्वामींची चौकशी होऊ दिली नाही

कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. ‘महाविकास आघाडी’ सरकार सुद्धा या कायद्यांविरोधात भूमिका घेणार असल्याचे सतेज पाटील म्हणाले.

अमरावतीमध्येही जोरदार आंदोलन

अमरावतीमध्येही काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले ( Yashomati Thakur organized tractor rally at Amaravati ). यावेळी माजी आमदार विरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखेडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी