26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeटॉप न्यूजधक्कादायक! कोरोना लस संशयाच्या घे-यात

धक्कादायक! कोरोना लस संशयाच्या घे-यात

टीम लय भारी

मुंबई : मोठा गाजावाजा करत जगभरातील तीन कोरोना लशींबाबत त्या 90 टक्क्यांहून अधिक परिणामकारक असल्याचे सांगण्यात आले. यामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आता या लशीच्या परिणामाबाबत जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीबाबत संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे कोरोना लस संशयाच्या घे-यात सापडल्या आहेत. कंपनीने जाहीर केलेल्या अंतिम विश्लेषणात या लशीची कार्यक्षमता 70 टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात आल्याने सर्वांना जोरदार धक्का (Shocking) बसला आहे.

गेल्या काही दिवसांत जगभरातील तीन कोरोना लशींबाबत गूड न्यूज देण्यात आली. तिस-या टप्प्यातील ट्रायलमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, अ‍ॅस्ट्राझेनका आणि सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची लस 90 टक्क्यांहून अधिक परिणामकारक असल्याचे सांगण्यात आले. मात्र या लशीच्या परिणामाबाबत जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीबाबत आता संशय व्यक्त केला जातो आहे.

सोमवारी कंपनीने जाहीर केलेल्या अंतिम विश्लेषणात या लशीची कार्यक्षमता 70.4 टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात आले. पहिला डोस दिल्यानंतर त्याचे परिणाम 90 टक्क्यांपर्यंत दिसून आले होते. मात्र दुस-या डोसनंतर 62 टक्के परिणामकारकता दिसल्याचे आता सांगितले जात आहे. त्यामुळे दोन्हीचे एकत्र विश्लेषण केल्यास ही लस 70 टक्के परिणामकारक असल्याचे सांगितले जात आहे.

या लशीच्या ट्रायलबाबत आता नवा खुलासा होतो आहे. दोन वेगवेगळ्या समूहांना दोन वेगवेगळे डोस देण्यात आले. एका समूहाला दोन समान पूर्ण डोस देण्यात आले. तर दुस-या समूहाला एक अर्धा आणि एक पूर्ण डोस देण्यात आला होता. पहिल्या समूहात जास्तीत जास्त लोकांचा समावेश होता, ज्यांच्यावर लस 62 टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले तर दुस-या समूहात कमी लोक असूनही त्यांच्यावर लस 90 टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले.

ऑक्सफर्डनेदेखील आपण लशीच्या डोसमध्ये बदल केल्याचे म्हटले आहे. एक पूर्ण डोस देण्याऐवजी अर्धा डोस देण्याचे ठरले होते. मात्र आता सर्वांना एकच डोस दिला जाणार आहे, असेही ऑक्सफर्डने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेतील लस विकसित करण्यासाठी फंडिंग कार्यक्रम ऑपरेशन वार्प सीडचे प्रमुख मोन्सेफ स्लाओई यांनी मंगळवारी खुलासा केला की, दुस-या समूहात फक्त 55 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाचे लोक होते. अशा लोकांमध्ये कोव्हिड 19 चा गंभीर परिणाम होण्याचा धोका कमी असतो. ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनकाने सोमवारी आपल्या लशीचा ट्रायलचा अहवाल जारी करताना वयाची माहिती दिली नव्हती.

विश्लेषक ज्योफ्री बोर्जेस यांनी सांगितले की, अ‍ॅस्ट्राझेनकाने छोट्या समूहावर करण्यात आलेल्या ट्रायलचा परिणाम दाखवला. कंपनीने आपल्या परिणामांमध्ये मोठी गडबड केली आहे. त्यामुळे अमेरिकेत याला परवानगी मिळणार नाही.

फायझरचे ग्लोबल रिसर्च अँड डेव्हलमेंट युनिटचे माजी प्रमुख जॉन लामॅटिना यांनी ट्वीट केले आहे की, या लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळणे कठीण आहे. ट्रायलच्या मध्येच डोस का बदलले, दोन वेगवेगळ्या समूहाला वेगवेगळे डोस का दिले, याचे स्पष्ट कारण देण्यात आलेले नाही.

भारतात या लशीचे तिस-या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. पुढील वर्षात ही लस उपलब्ध होईल. मात्र त्याआधीच लशीला आपत्कालीन मंजुरीही मिळू शकते, असे सांगितले जात आहे. यूकेतील ट्रायलच्या अहवालावर भारतात या लशीला आपत्कालीन मंजुरी द्यायची की नाही हे ठरेल, असे सांगण्यात आले. मात्र आता या लशीच्या ट्रायलवरच प्रश्नचिन्हं उपस्थित होत असतील. तर कदाचित या लशीला भारतातही आपत्कालीन वापरासाठी लवकर मंजुरी मिळणार नाही, असे दिसून येते.

दरम्यान, भारतात ट्रायल सुरू असलेल्या कोरोना लशीमुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच ही लस उपलब्ध होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या दिशेने मोदी सरकारने लशीकरणाची जोरदार तयारीही सुरू केली आहे. मात्र कंपनीने जाहीर केलेल्या अंतिम विश्लेषणात या लशीची कार्यक्षमता 70.4 टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात आल्याने सर्वांना जोरदार धक्का बसला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी