28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्र'छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या अडाणीवर गुन्हा दाखल करा'

‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या अडाणीवर गुन्हा दाखल करा’

 

टीम लय भारी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अदानी विमानतळ असे नामफलक गौतम अदानींनी लावले आहेत. त्याविषयी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींनी चीड व्यक्त करत अदानींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलीस आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे ( adani group changed the name of chatrapati shivaji maharaj international airport to adani airport).

adani

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी 13 जुलै पासून अदानी ग्रुप कडे सोपविण्यात आलेली आहे. त्यानंतर काही दिवसातच विमानतळाच्या बाहेर व आतमध्ये अदानी विमानतळ अश्या नावाचे फलक लागले गेले.

चोर चोर मावसभाऊ, अर्ध अर्ध वाटून खाऊ : सदाभाऊ खोतadani

Video : आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर डागली तोफ

सदर नामफलक तोडले गेले आहेत, परंतु विमानतळाचे अधिकृत नाव बदलण्याची परवानगी अदानींना कुणी दिली अशा आशयाची तक्रार करत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी गौतम अदानींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (Anil galgali requested mumbai police and cm to file complaint against adani)

adani

गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विलेपार्ले पोलिसांसहित पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी असे म्हंटले आहे की, गौतम अदानी यांनी विमानतळाला अदानी विमानतळ असे नाव देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी दिली खुषखबर, सर्वसामान्यांसाठी 8,205 घरांची सोडत

Maha flood fury: Over 100 killed, thousands evacuated; CM visits affected areas

गौतम अदानी यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, अदानी आणि समूहावर भारतीय दंड संहिता कलम 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच कुणाप्रति अपमानास्पद वागणूक केल्या प्रकरणी दुर्भावना कृती 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करावा.

adani, airport, Mumbai airport, anil galgali, uddhav thackeray, mumbai police, gautam adani, मराठी बातम्या, लय भारी बातम्या, तुषार खरात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी