29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंची योजना चांगली, पण ती वेशीला टांगली !

आदित्य ठाकरेंची योजना चांगली, पण ती वेशीला टांगली !

टीम लय भारी

मुंबई : आदित्य ठाकरे हे मेहनती व कल्पक नेते आहेत. सामाजिक दृष्टीकोनातूनही ते अनेक चांगले उपक्रम हाती घेतात. असाच एक अतिउत्कृष्ट उपक्रम त्यांनी हाती घेतला होता. पण सरकारी अनास्थेमुळे या उपक्रमाच्या तीन तेरा वाजले आहेत (Aditya Thackeray plan was good, but it hung on the door).

आदित्य ठाकरे यांच्या या उपक्रमाचा सत्यानाश करण्याचे श्रेय जाते ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात ही कल्पक योजना सरकारने जाहीर केली होती.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदित्य ठाकरेंनी घेतली आरे कॉलनीतील आदिवासी बांधवांची भेट

आदित्य ठाकरेंचा पुढाकार, मुंबईत आणखी ६ पूल उभारणार

प्लास्टीक हे पर्यावरणासाठी, लोकांसाठी व मुक्या जनवरांसाठी घातक आहे. प्लास्टीकवर बंदी आणण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली. हा निर्णय अंमलात आणण्यासाठी त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला.

योगायोगाने पर्यावरण खाते शिवसेनेच्या रामदास कदम यांच्याकडे होते. रामदास कदम यांनी ‘प्लास्टीक बंदी’ची अंमलबजावणी खमकेपणाने केली.

आदित्य ठाकरेंनी आदिवासींच्या उन्नतीसाठी दिला ‘शब्द

Maha govt aims to prevent COVID spread, says Aditya Thackeray as BJP protests to allow vaccinated people on Mumbai trains

महाराष्ट्रातील या ‘प्लास्टीक बंदी’मुळे गुजराती व्यापाऱ्यांचा धंदा मात्र बुडाला. या व्यापाऱ्यांनी दबाव टाकायला सुरूवात केली. गुजरात्यांच्या दबावापुढे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांगी टाकली. या योजनेची ठोस अंमलबजावणी होणारच नाही, याची पुरेपुर काळजी फडणवीस यांनी घेतली. त्यामुळे चांगल्या योजनेचे वाटोळे फडणवीस यांच्या काळात झाल्याचे सूत्रांनी सांगितले (Therefore sources said that a good plan was hatched during Fadnavis tenure).

Aditya Thackeray plan was good, but it hung on the door
आदित्य ठाकरे

स्वत:चे सरकार असूनही ‘प्लास्टीक बंदी’ची अंमलबजावणी का नाही ?

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आहे. आदित्य ठाकरे हे पर्यावरण खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे ‘प्लास्टीक बंदी’ची अंमलबजावणी अंमलात आणणे त्यांच्यासाठी सोपे आहे.

ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर ‘कोरोना’चे संकट ओढवले. त्यामुळे प्लास्टीक बंदीच्या निर्णयावर भर देता आला नाही, असे ठाकरे समर्थक सांगतात.

मात्र, ‘कोरोना’च्या या संकटातही सरकार अन्य योजना राबवत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनीही प्लास्टीक बंदीची योजना खमकेपणाने राबवायला हवी. त्यांनी मनावर घेतले तर ‘प्लास्टीक’च्या वापरावर अंकुश बसेल. त्यांच्या स्वप्नातील एक चांगल्या योजनेचा समाज व पर्यावरणासाठी मोठा फायदा होईल, अशी भावना सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले (Such sentiments were expressed by the sources while talking to ‘Laya Bhari’).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी