33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईचला करुया संकल्प निरोगी महाराष्ट्राचा अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन

चला करुया संकल्प निरोगी महाराष्ट्राचा अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन

टीम लय भारी 

मुंबई: आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त निरोगी महाराष्ट्र (फिट महाराष्ट्र) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करुन निरोगी महाराष्ट्राचा संकल्प करुया, असे आवाहन केले आहे. Ajit Pawar’s appeal to the citizens of healthy Maharashtra

राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका आणि मेडस्केप इंडिया यांच्या वतीने संकल्प निरोगी महाराष्ट्राचा (फिट महाराष्ट्र) उपक्रमाला आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नेतृत्वाखाली कोरोना कालावधीत अतिशय चांगले काम केले. मात्र अद्यापही आपल्याला आरोग्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करायच्या आहेत. त्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत असं पवारांनी म्हटलं आहे.

आपल्या भाषणात त्यांनी म्हटलं की, आरोग्याचा आणि विकासाचा एकमेकांशी संबंध आहे. कारण आरोग्यदायी व्यक्तीच राज्य आणि देशाच्या विकासासाठी भरीव योगदान देऊ शकतो. आपण क़ोरोनाच्या दोन लाटांवर मात केली. Ajit Pawar’s appeal to the citizens of healthy Maharashtra

बैठ्या जीवनशैलीमुळे आरोग्य समस्या उद्भवत आहेत. यासाठी नियमित व्यायाम, सकस आहार घेतला पाहिजे. तणावमुक्त जगण्यासाठीही विशेष प्रयत्न करायला हवेत. शरीराबरोबरच मनाचे आरोग्य जपण्यासाठीही विशेष प्रयत्न करायला हवेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, प्रधान सचिव निलीमा करकेट्टा, आरोग्य आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, आरोग्य सेवा संचालक डॉ साधना तायडे, उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, सहाय्यक संचालक डॉ. पद्मजा जोगेवार, उपसंचालक डॉ कैलास बाविस्कर, सहाय्यक संचालक डॉ.  संजीव जाधव आदी उपस्थित होते. Ajit Pawar’s appeal to the citizens of healthy Maharashtra

हे सुध्दा वाचा: 

अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडल्यास, मशिदीवर लाऊडस्पीकर लावण्याचा मुद्यावर चर्चा: अजित पवारांचे भाष्य

Why This Division, Asks Ajit Pawar on Raj Thackeray’s Warning Against Use of Loudspeakers at Mosques

ईडीचा भुंगा यशवंत जाधवांच्या मागे, किरीट सोमय्यांनी पिटली दवंडी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी