28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeटॉप न्यूजउपमुख्यमंत्री अजित पवारांनी रौप्यपदक विजेता मीराबाई चानू यांचे केले अभिनंदन

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रौप्यपदक विजेता मीराबाई चानू यांचे केले अभिनंदन

टीम लय भारी

मुंबई:- टोकियो ऑलिंपिक 2020 स्पर्धेत जगभरातील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. आज टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात देशाला वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक आणि पहिलं ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. मीराबाई चानू यांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे (Ajit Pawar has congratulated Weightlifte Mirabai Chanu).

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात देशाला वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक आणि पहिलं ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे. मीराबाई चानू यांनी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मिळवलेलं यश भारतीय संघातील अन्य खेळाडूंना उत्तम कामगिरी करुन पदक जिंकण्यासाठी प्रेरणा, विश्वास देईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीराबाई चानू यांचे कौतुक केले

शिल्पा शेट्टीला दुहेरी चिंता; नवरा तुरुंगात तर नवा चित्रपट अपयशाच्या सावटाखाली

टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकून मीराबाई चानू यांनी रचला इतिहास

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रौप्यपदक विजेता मीराबाई चानू यांचे अभिनंदन केले आहे (Ajit Pawar has congratulated Weightlifte Mirabai Chanu)C
मीराबाई चानू

2016 च्या रिओ ऑलिंपिकमधल्या अपघाती अपयशावर मात करुन मीराबाई चानू यांनी यंदाच्या टोकियोमध्ये जिंकलेले पदक हे अपयशाने खचून न जाता नव्या ऊर्जेनं जीवनात कसे यशस्वी व्हावे, याचे आदर्श उदाहरण असल्यांचही उपमुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. भारतीय हॉकी संघाने आपला पहिला सामना न्यूझिलंडविरुद्ध 3-2 असा जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघातील खेळाडूंचं अभिनंदन केले असून अन्य खेळाडूंनाही उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Ajit Pawar has congratulated Weightlifte Mirabai Chanu
मीराबाई चानू

हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री; चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल

Tokyo Olympics 2020: Weightlifter Mirabai Chanu wins silver medal

भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून भारताचे नाव जगभरात उज्ज्वल केले आहे. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे (This is India’s second weightlifting Olympic medal in Indian history.)

सिडनी ऑलिम्पिक 2000 मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. कर्णम मल्लेश्वरीने हे पदक भारताला मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे (Mirabai Chanu is the first Indian weightlifter to win an Olympic silver medal).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी