मुंबई

शेतकऱ्यांनो टोकाची भूमिका घेऊ नका : अजित पवार

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो घाबरू नका, ऊस गाळप संपवायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका महाविकास आघाडी सरकार तुमच्या पाठीशी आहे असे आवाहन राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

टीम लय भारी 

शेतकऱ्यांनो टोकाची भूमिका घेऊ नका : अजित पवार

मुंबई:  ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो घाबरू नका, ऊस गाळप संपवायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका महाविकास आघाडी सरकार तुमच्या पाठीशी आहे असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी केले. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. Ajit pawar maharashtra farmers

ऊसाचे काय होणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे. सध्या गळीत हंगाम वाढला आहे. मे महिन्यात रिकव्हरी लॉस आहे. यावर साखर आयुक्त व सहकारमंत्री आढावा घेत आहेत. अजित पवार (Ajit pawar) यांनी बीड जिल्हयातील दु:खद घटनेवर भाष्य केले.

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसल्याचे वक्तव्य केलं आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी भाष्य केले आहे.

नाना पटोले यांचे विधान हास्यास्पद आहे. ते कुठुन आले आहेत ते सर्वांना माहीत आहे. त्यामुळे भाजपने बोलावं का नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेडलाईन बनण्यासाठी ते बोलले असावेत. जबाबदार नेत्याने वक्तव्य करताना वेडेवाकडे परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा: 

भारतीय विदेशी सेवेत रूजू झालेल्या अधिकाऱ्यांनी घेतली उद्योगमंत्र्याची भेट

SC Sedition Order Must be Viewed in Context of Govt’s Positive Suggestions: BJP

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close