28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयभाजपच्या आंदोलनावर अमोल मिटकरी, रूपाली चाकणकर यांचे टीकास्त्र

भाजपच्या आंदोलनावर अमोल मिटकरी, रूपाली चाकणकर यांचे टीकास्त्र

टीम लय भारी

मुंबई :- भाजप आज ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन करत आहे. भाजपच्या या आंदोलनाची राष्ट्रवादी काँग्रेसकडून खिल्ली उडवली जात आहे. भाजपच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी आणि रूपाली चाकणकर यांनी टीका केल्या आहेत (NCP Amol Mitkari and Pranali Chakankar have criticized the BJP agitation).

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन म्हणजे, “बेगाने शादी मे अब्दुला दिवाना”. अशा मजेशीर आणि खोचक शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी म्हणाले आहेत (NCP state general secretary Amol Mitkari has said).

तीच चूक पुन्हा…

‘कोरोना’ची नवी डोकेदुखी, डेल्टा प्लस हातपाय पसरतोय

त्यानंतर ते म्हणाले, आजच्या दिवशी आंदोलन करणे भाजपसाठी सोयीचे आहे. मात्र, सोयीचे राजकारण फार काळ टिकत नसते असे अमोल मिटकरी ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले, ‘आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत असताना भाजपाला मात्र सोयीने छत्रपती शाहु महाराज यांचा विसर पडलेला दिसतो. सुडबुद्धीने वागणारी भाजपची मंडळी किती दुटप्पी आहेत हे यावरून दिसते. आंदोलन आपला हक्क आहे मात्र सोयीचे राजकारण जास्त दिवस टिकत नसते.’ भाजप हे नेहमी सोयीचे राजकारण करते अशी अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे (Amol Mitkari has criticized BJP for always doing convenient politics).

राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी एकोणिसाव्या शतकातील माहिती सांगत. त्या म्हणाल्या, १९९० साली मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर देशभरात OBC आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आणि ‘योगायोग’ असा की त्यानंतर मंडल वि. कमंडल हा वाद कुणी चालू केला हे समस्त देशाला ठाऊक आहे.

मुकेश अंबानी आणणार जगातील सर्वात स्वस्त फोन

BJP मुख्यालय में पार्टी के शीर्ष नेताओं के बीच मंथन, अमित शाह-राजनाथ सहित कई मंत्री हुए शामिल

यानंतर दुसरे ट्विट करत त्या म्हणाल्या, त्या काळी OBC आरक्षणाला विरोध करणारे लोक आज OBC समाजाचा खोटा कळवळा आणून महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करत असल्याचे समजले. “अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है.” अशा खोचक शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

ओबीसी आरक्षणासाठी भाजपने चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली होती. त्यादिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकांचा वर्षाव केला आहे. एका पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले होते. भाजप सरकारची ही नाटक आहेत. ओबीसी समाजाचे आरक्षण भाजपमुळे रद्द झाले. असेच नाना पटोले देखील म्हणाले होते. आरक्षण रद्द होण्याला भाजपचे जवाबदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे टीकास्त्र अजूनही सुरू आहे (This vaccination from NCP is still going on).

भाजप हे आंदोलन आपल्या सोयीनुसार करत आहे. स्वतःच आधी विरोध केला. आता स्वतःच आंदोलन करत आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणत आहे. आज राज्यात एकाच दिवशी दोन आंदोलन होणार आहे. भाजप ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी करत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या विरोधात आंदोलन करत आहे (NCP is agitating against BJP).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी