27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयअशोक चव्हाणांच्या राज्यपाल भेटीने उलटसूलट चर्चा सुरू

अशोक चव्हाणांच्या राज्यपाल भेटीने उलटसूलट चर्चा सुरू

टीम लय भारी

मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी गुरूवारी सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली ( Ashok Chavan met governor Bhagat Singh Koshyari ). अचानक घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

अशोक चव्हाणांच्या राज्यपाल भेटीने उलटसूलट चर्चा सुरू

अशोक चव्हाण यांनी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती कोश्यारी यांच्या कार्यालयामार्फत जारी करण्यात आली आहे. भेटीमागील कारणाबाबत अशोक चव्हाण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, तेथूनही ही सदिच्छा भेट असल्याचेच सांगण्यात आले.

हे आवर्जुन वाचा

धनंजय मुंडेंचा मागासवर्गीयांसाठी मोठा निर्णय; भाजप सरकारने घातला होता कोलंदाडा, मुंडेंनी तो हटवला

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांकडून मराठा आरक्षणाबाबत अपप्रचार; अशोक चव्हाण संतापले

शिवस्मारकाच्या कामात गैरप्रकार नकोत : अशोक चव्हाणांची अधिकाऱ्यांना तंबी

भर पावसात काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपविरोधात केली निदर्शने

आदित्य ठाकरे म्हणाले, मी बाळासाहेब ठाकरेंचा नातू; माझ्याकडून दुष्कृत्य होणार नाही

परंतु दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे वरिष्ठ नेते पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी लवकरच जाणार आहेत, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

Ashok Chavan met governor
ही भेट सदिच्छा होती, असे राजभवनमध्ये कळविले आहे

‘महाविकास आघाडी’ सरकारमध्ये काँग्रेस हा घटक पक्ष आहे. परंतु काँग्रेसच्या मंत्र्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी काही मंत्र्यांमध्ये आहे ( Congress Ministers reluctant in Mahavikas Aghadi Government ). सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभाजन करण्याचा प्रस्ताव पंधरड्यापूर्वी मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चेला आला होता.

अशोक चव्हाण या खात्याचे मंत्री आहेत. परंतु चव्हाण यांनाच या विभाजनाबाबत अधिकाऱ्यांनी कसलीच कल्पना दिली नव्हती. त्यामुळे चव्हाण नाराज असल्याचीही चर्चाही रंगली होती ( Ashok Chavan upset on officers).

Mahavikas Aghadiअशातच आता चव्हाण यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे, शिवाय सोनिया गांधींच्या भेटीलाही वरिष्ठ नेते जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा रंगू लागली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी