31 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रराज्य सरकारचा सर्वात मोठा आणि सतर्कपूर्ण निर्णय, आता सातबारा होणार बंद!

राज्य सरकारचा सर्वात मोठा आणि सतर्कपूर्ण निर्णय, आता सातबारा होणार बंद!

टीम लय भारी

मुंबई : राज्य सरकारने राज्याच्या भूमी अभिलेखात सर्वात मोठ्या निर्णयाची सुनावणी केली आहे. यामध्ये सातबारा उतारा बंद करण्यात आला आहे. राज्यातील मविआ सरकारने एका मोठ्या निर्णयाची सुनावणी केली आहे. यामध्ये सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे(Big decision of the state government, now Satbara will be closed).

शहरीकरणात वाढ झाली असल्यामुळे काही शहरांत तर शेतजमीनच शिल्लक राहिलेली नाहीय. त्यामुळं हा निर्णय घेतला गेला आहे. ज्या शहरांत सिटी सर्व्हे झाले आहे आणि सातबारा उताराही सुरू आहे, त्या शहरांत सातबारा बंद करून प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून घेण्यात आलेला आहे.

गेल्या काही वर्षात शहरीकरण वाढलेलं निदर्शनास आल्यामुळे काही शहरी भागात शेतजमिनीच शिल्लक नाहीय. त्यामुळे सातबाऱ्याचं रुपांतर आता प्रॉपर्टी कार्डमध्ये झालंय. मात्र, कर चुकवण्यासाठी आणि इतर लाभ मिळावेत यासाठी सातबारा वापरला जातो. तसेच काही ठिकाणी तर फसवणुकीचे प्रकारही उघड झाले आहेत. त्यामुळे सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून घेण्यात आली असून, या निर्णयाची अंमलबजावणी सुरुवातीला काही शहरांत करण्यात येणार आहे(Satbara has now been converted into a property card).

हे सुद्धा वाचा

नितेश राणेंचा पोलीस कोठडीतला मुक्काम अजूनच लांबला

पालघरमध्ये लवकरच ट्रान्सजेंडरसाठी ओळखपत्र सुविधा

लता मंगेशकर निधनामुळे दुखवटा, काय आहे सार्वजनिक सुट्टी देण्याचं कारण ?

Maharashtra Textile Minister halts lifting of power subsidy to powerlooms

नाशिक, सांगली, मिरज आणि पुण्यातील हवेली तालुक्यात या निर्णयाची प्राथमिक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानंतर राज्यात लागू करायचा की, काय याबाबत विचार केला जाणार आहे, असे समजते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी