36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयचेंबूरमध्ये भाजपच्या पोलखोल सभेच्या रथाची तोडफोड , मविआच्या कार्यकर्त्यांवर भाजपचा संशय

चेंबूरमध्ये भाजपच्या पोलखोल सभेच्या रथाची तोडफोड , मविआच्या कार्यकर्त्यांवर भाजपचा संशय

टीम लय भारी

मुंबई : महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोल खोल करण्यासाठी भाजपने (BJP) चेंबूरमध्ये सभेचं आयोजन केलं होतं. दरम्यान, पोलखोल सभेआधीच रथाची तोडफोड केली आहे. चेंबूर येथे भाजपच्या पोलखोल अभियानाच्या रथाची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला जोपर्यंत अटक होतं, नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली. या तोडफोडीबाबत मविआच्या कार्यकर्त्यांवर भाजपचा संशय आहे. मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल या सभेत करण्यात येणार आहे. (BJP’s Polkhol rally chariot vandalized at chembur)

मंगळवार दिनांक १९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता महाविकास आघाडी सरकारने केलेल्या विविध गैरव्यवहार कामाची पोलखोल अभियान रथ यात्रेची सुरुवात विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आली. आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या उपस्थितीत या रथ यात्रेची सुरुवात होणार होती.

तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे.कालपासून सुरु झालेल्या भाजपच्या पोलखोल सभेला प्रचंड प्रतिसाद आहे. मुंबई महानगरपालिकेचे भ्रष्ट्राचार शिगेला पोहोचला आहे. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

भाजपचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी पोल खोल सभेचं आयोजन केलं आहे. संध्याकाळी सात वाजता मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची पोल खोल या सभेतून करण्यात येणार असून यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार हेसुद्धा उपस्थित असणार आहेत. दरम्यान, आता झालेल्या या तोडफोडीच्या घटेनंतर पोलखोल सभा होणार की नाही याबाबत सध्या तरी कोणतीच प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी दिलेली नाही.


हे सुद्धा वाचा :

देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता आहे : जयंत पाटील

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन म्हणजे युद्धात जिंकले व तहात हारले अशीच अवस्था : श्रीरंग बरगे

राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होत आहे :  रोहित पवार

VIDEO : सदाभाऊंनी करुन दिली पवारांनच्या ‘त्या’ एका वक्तव्याची आठवण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी