महाराष्ट्रराजकीय

देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता आहे : जयंत पाटील

 राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. देशात आणि राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता आहे. त्यांना फुले - शाहू - आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याची दिशा आपल्याला द्यावी लागेल. यासाठी वैचारिक बैठका घ्या असे आवाहन राष्ट्रवादी यांनी वाई येथे केले आहे.

टीम लय भारी 

देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता आहे : जयंत पाटील

मुंबई: राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. देशात आणि राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता आहे. त्यांना फुले – शाहू – आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याची दिशा आपल्याला द्यावी लागेल. यासाठी वैचारिक बैठका घ्या असे आवाहन राष्ट्रवादी यांनी वाई येथे केले आहे.

सध्या देशात गोबेल्स निती अवलंबिली जात आहे. खोट्याला खरं ठरवण्याचा खटाटोप सुरू आहे. या गोबेल्स नितीला मारक अशी संघटना आपल्याला तयार करायची आहे. आज पेट्रोल – डिझेल, सिलेंडरचे भाव वाढले आहेत ही खरी गोष्ट लोकांना जावून सांगा असेही मार्गदर्शन जयंत पाटील यांनी केले.

पक्षाची एक योग्य रचना आपल्याला करायची आहे, ही रचना येत्या काळात तुम्ही कराल असा विश्वासही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. वाई – खंडाळा – महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला.

आपल्या पक्षाची बैठक व्यापक केली पाहिजे. संघटना व्यापक झाली पाहिजे. सर्व समाजातील, सर्व गावातील लोकांना एकत्र करून आपल्या संघटनेत घ्या असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

हे सुध्दा वाचा:

वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची – जयंत पाटील

Raj Thackeray targeting NCP at BJP’s behest: Jayant Patil Read more at: 

महाराष्ट्रात भोंगा आणि हनुमान चालिसावरुन राजकीय चकमक सुरू

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close