29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रDhangar Reservation : धनगर आरक्षणातही दोन्ही ‘छत्रपतीं’नी लक्ष घालावे!

Dhangar Reservation : धनगर आरक्षणातही दोन्ही ‘छत्रपतीं’नी लक्ष घालावे!

कोल्हापुरातील गोलमेज परिषदेत साकडे

टीम लय भारी

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांचे वारस असलेले खासदार संभाजीराजेंनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी (Dhangar Reservation) पाठिंबा द्यावा, त्यांनी लक्ष द्यावे, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल तेव्हा धनगर आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागावा यासाठी छत्रपती संभाजीराजे, उदयनराजेंकडे मागणी करणार आहे असे धनगर समाजाचे नेते आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी म्हटले आहे.

कोल्हापुरात धनगर समाजाची पहिली गोलमेज परिषद संपन्न झाली. या बैठकीच्या निमित्ताने धनगर समाजातील अनेक नेते, मान्यवर कोल्हापुरात दाखल झाले होते. यावेळी राम शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात अनेकवेळा सत्तांतरे झाली, जो विरोधी पक्षात असतो तो म्हणतो, सत्तेत आल्यावर आम्ही आरक्षण देऊ, आणि जो सत्तेत असतो तोही म्हणतो आम्ही देऊ अशी भावना ७० वर्षात झाली आहे. त्यामुळे लोक या सगळ्याला वैतागली आहेत असं त्यांनी सांगितले.

मी राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलो तरी लोक आता वैतागले आहेत. गेल्या ७० वर्षापासून सत्ताधारी आणि विरोधकांनी धनगर समाजाची फसवणूक केली अशी भावना लोकांमध्ये आहे. त्यामुळे गोलमेज परिषदेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन हा विषय मार्गी लावाला अशी मागणी लावून धरली आहे. कोल्हापूरात धनगर गोलमेज परिषद पार पाडली असे राम शिंदेंनी सांगितले.

आरक्षणाचे जनक शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांचा वारसा छत्रपती संभाजीराजे चालवत आहेत. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळावे ही आमची मागणी आहे. मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे पुढाकार घेत आहेत, त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणावरही संभाजीराजेंनी लक्ष घालावे, मराठा आरक्षणासोबत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन संभाजीराजेंनी धनगर समाजाला दिल्याचे राम शिंदे यांनी सांगितले.

गोलमेज परिषदेत मांडलेले ठराव

महाराष्ट्रात धनगर समाज १२ पोटशाखेंमध्ये विखुरला आहे. प्रत्येक पोटशाखेत कोणी ना कोणी नेता आहे, राजकीय पक्षाचा नेता, आजीमाजी आमदार, खासदार आणि समाजातील प्रतिष्ठित मान्यवर आहे, अशा सर्व लोकांनी घटनेमध्ये दिलेले आरक्षण या थेट आणि तात्काळ लाभ मिळेपर्यंत ‘धनगर सारा एक’ या भावनेतून आंदोलन करायचं, सर्वानुमते हा ठराव संमत केला. धनगर समाजाचा पारंपारिक व्यवसाय मेंढपाळ आणि भटकंती आहे, प्रत्येक जिल्ह्यातून तो प्रवास करत असतो, तेव्हा मेंढपाळांवर हल्ले होतात, त्यावर राज्य शासनाने तात्काळ कठोर कायदा आणून मेंढपाळांना संरक्षण देण्याची मागणी.

धनगर आरक्षणासाठीही पुढाकार घेणार : संभाजीराजे

गोलमेज परिषदेनंतर धनगर समाजाच्या नेत्यांनी संभाजीराजेंची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजेंनी आपली भूमिका विशद केली. संभाजीराजे म्हणाले की, धनगर समाजाने गोलमेज परिषद कोल्हापुरात घेतली याचा आनंद, छत्रपती घराणे आणि धनगर समाजाचे जिव्हाळ्याचे नाते आहे. चौंडीच्या कार्यक्रमातही मी धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. आजदेखील धनगर समाजाचे नेते राम शिंदे भेटण्यासाठी आले, त्यांच्याकडून प्रश्न समजून घेतला आहे. केंद्र सरकारकडे धनगर समाजाच्या मागणीसाठी पाठपुरावा करणार आहे. त्याचसोबत बहुजनांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, धनगर आणि मराठा समाज एकत्र आहोत असेही त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी