33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeव्यापार-पैसाFacebook Bug : फेसबुकवर अचानक सर्वांचे फॉलोवर्स कमी झाल्याने एकच खळबळ!

Facebook Bug : फेसबुकवर अचानक सर्वांचे फॉलोवर्स कमी झाल्याने एकच खळबळ!

सध्या फेसबुकवर एकाचवेळी अनेकांच्या फॉलोवर्सची संख्या एकत्रित खाली आल्याने एकच गोंधळ उडाला आहे. यावेळी फॉलोअर्स कमी झाल्यामुळे फेसबुकवर एकच खळबळ उडाली आहे.

सध्याच्या जगात सोशल मीडियाला अनेक लोकांनी आपले जीवन समजलेले आहे. सध्याची युवा पिढी तर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर स्वत:चे फॉलोवर्स वलाढवण्यात रमलेली दिसून येते. विशेष म्हणजे मित्रामित्रांमध्येच अनेकदा फॉलोवर्स वरून स्पर्धा रंगलेली दिसून येते. अशा परिस्थितीत सध्या फेसबुकवर एकाचवेळी अनेकांच्या फॉलोवर्सची संख्या एकत्रित खाली आल्याने एकच गोंधळ उडाला आहे. यावेळी फॉलोअर्स कमी झाल्यामुळे फेसबुकवर एकच खळबळ उडाली आहे. फॉलोअर्स कमी झाल्याची चर्चा सर्वत्र आहे. बाब अशी आहे की ज्याच्या वैयक्तिक प्रोफाइलवर लाखो फॉलोअर्स होते त्यांची संख्या 10 हजारांहून कमी झाली आहे. फेसबुकवर बहुतांश लोक याबाबत पोस्ट लिहित आहेत.

फेसबुक अर्थात मेटाचा मालक असणाऱ्या मार्क झुकरबर्गचे फॉलोअर्सही कोटींवरून 9,994 वर आले आहेत. म्हणजेच कालपर्यंत ज्यांचे काही लाख, कोटी किंवा काही हजार फॉलोअर्स होते, आज ते सर्व 10 हजारांवर आले आहेत. फॉलोअर्स कमी झाल्याची तक्रार सर्व युजर्स करत आहेत. मात्र, फॉलोअर्स नेमके का कमी झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हे सुद्धा वाचा

Disha Vakani Throat Cancer : प्रेक्षकांच्या लाडक्या ‘दयाबेन’ला घश्याचा कॅन्सर! वाचा काय आहे खरी गोष्ट

Doctor G Special Screening : आयुष्मान खुराना अभिनित ‘डॉक्टर जी’च्या निर्मात्यांनी आयोजित केली डॉक्टर्ससाठी विशेष स्क्रीनिंग

T20 World Cup : बुमराह अन् चहरची जागा भरून काढण्यासाठी शामीसह आणखी दोन वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाला रवाना होणार!

प्रत्येकजण 10 हजारांपेक्षा कमी आहे
फेक अकाउंटच्या तक्रारींबाबत फेसबुक वेळोवेळी अशा अकाऊंटवर कारवाई करत असते, त्यामुळे लोकांचे फॉलोअर्स कमी होत असतात. मात्र यावेळी फॉलोअर्सची संख्या खूप कमी होत आहे. त्यातही विशेष म्हणजे प्रत्येकाचे फॉलोअर्स 10 हजारांवर आले आहेत. उदाहरणार्थ झुकेरबर्गच्या बाबतीत ही संख्या 4 कोटींवरून 10 हजारांहून कमी झाली आहे.

फॉलोअर्स का कमी होत आहेत
यामुळे, हे अवघड वाटते की हे बनावट खाती काढून टाकण्याचा परिणाम असू शकतो. काही लोक म्हणतात की हे शक्य आहे की फेसबुकमधील बगचा परिणाम आहे. यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे. हे प्रकरण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी फेसबुकनेही अधिकृतपणे कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.

दरम्यान, हा बग लवकरात लवकर सोडवून सुविधा सुरळीत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे फेसबुकवर प्रचलित अकाऊंट्स आहेत. शिवाय फेसबुकच्या माध्यमातून अनेकदा फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येत असतात. अशांत आता फेसबुककडून झालेल्या या चुकीचा फायदा आगामी काळात फसवणूक करणाऱ्या व्यक्तींनी घेतल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसानीला तोंड द्यावे लागेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी