30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रMumbai Robbery : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पोलिसांची मोठी कारवाई! 1.36 कोटींची सिगारेट जप्त

Mumbai Robbery : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पोलिसांची मोठी कारवाई! 1.36 कोटींची सिगारेट जप्त

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पोलिसांनी तब्बल 1 कोटी 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दरोडेखोरांकडे 1 कोटी 36 लाख रुपयांची सिगारेट जप्त करण्यात आली आहे.

सध्या देशभरात सर्वत्र चारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेक ठिकाणी पोलिस कारवायांच्या बातम्या नियमितपणे सुरू असतात. अनेकदा चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम जप्त केली जाते तर काही वेळेस मुद्देमाल जप्त केला जातो. मात्र, यावेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पोलिसांनी तब्बल 1 कोटी 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दरोडेखोरांकडे 1 कोटी 36 लाख रुपयांची सिगारेट जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे गुजरातमधील मांडवी पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सशस्त्र दरोडेखोरांनी मंगळवारी पहाटे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका ट्रकमधून 1.36 कोटी रुपयांची सिगारेट लुटली. मांडवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी सांगितले की, सहा अज्ञात दरोडेखोरांनी ट्रकचालकाला बेदम मारहाण करून त्याचे अपहरण केले. यानंतर ट्रक काही ठिकाणी नेऊन त्यातील सिगारेट काढून घेतली. हा ट्रक नवी मुंबईतील रबाळे येथून जयपूरच्या दिशेने जात होता.

हे सुद्धा वाचा

Ahmednagar News : अजूनही धनगर असुरक्षितच! एका व्यक्तिला 15 जणांच्या टोळक्याने केली मारहाण

Share Market : शेअर मार्केटमधील अस्थिरतेतही ‘या’ शेअरने ग्राहकांना दिलाय 251 टक्क्यांचा रिटर्न

Demonetisation : नोटबंदीचा निर्णय असंविधानिक! सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारले

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कारमधील दरोडेखोरांनी सकवार गावाजवळ ट्रक थांबवला. त्यांनी ट्रक चालकाला बेदम मारहाण केली आणि त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि ट्रक काही ठिकाणी नेला. ट्रकमध्ये भरलेली 1.36 कोटी रुपयांची सिगारेटची खेप रिकामी केल्यानंतर त्यांनी ट्रक सोडला. चारोटी टोलनाक्याजवळ दरोडेखोरांनी ट्रक चालकालाही सोडून पळ काढला. पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दरोडेखोरांचा सध्या मांडवी पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणातील कोणतीही माहिती समोर आल्यास ती प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती पोलिस प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. मात्र, या घटनेवरून सध्या देशातील प्रशासनाचा धाक संपत चालला असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे आता पोलिस प्रशासनाला अधिक सक्तीची कारवाई करण्याची आवश्यकता आसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात अशा प्रकारे होणाऱ्या दरोड्यांच्या घटना रोखण्यासाठी प्रशासन पूर्णपणे कार्यशील असेल अशी ग्वाहीही यावेळी पोलिसांकडून देण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी