35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यउन्हाळ्यात केस चिकट होतात? करा हे उपाय

उन्हाळ्यात केस चिकट होतात? करा हे उपाय

केसांना (Hair Care) तेल लावले नाही तरी उन्हाळ्याच्या दिवसात केस तेलकट, चिकट होतात. यामागे बाहेरचं वातावरण हे जसं मुख्य कारण असतं, तसंच या वातावरणामुळे येणारा घाम हेसुद्धा महत्त्वाचं कारण असतं. ज्याप्रमाणे चेहऱ्यावर घामामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात, त्यामुळे पुरळ येण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे टाळूलाही घाम येतो. आणि केसांची (Hair) क्युटिकल्स बंद होतात. त्यामुळं जाणून घेऊयात उन्हाळ्यात केसांच्या चिकटपणापासून मुक्तता कशी मिळवायची त्याबद्दल...(hair care tips in summer season)

केसांना (Hair Care) तेल लावले नाही तरी उन्हाळ्याच्या दिवसात केस तेलकट, चिकट होतात. यामागे बाहेरचं वातावरण हे जसं मुख्य कारण असतं, तसंच या वातावरणामुळे येणारा घाम हेसुद्धा महत्त्वाचं कारण असतं. ज्याप्रमाणे चेहऱ्यावर घामामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात, त्यामुळे पुरळ येण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे टाळूलाही घाम येतो. आणि केसांची (Hair) क्युटिकल्स बंद होतात. त्यामुळं जाणून घेऊयात उन्हाळ्यात केसांच्या चिकटपणापासून मुक्तता कशी मिळवायची त्याबद्दल…(hair care tips in summer season)

टाळूची मालिश

शरीरात रक्ताभिसण सुरळीत होणे गरजेचे आहे. टाळूची मालिश करत रहावी. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना फायदा होतो. यासाठी केसांना खोबऱ्याच्या तेलाने मालिश करावी.

टोमॅटोचा वापर

टोमॅटो मास्क केसांच्या मुळाशी असलेल्या त्वचेचा पीएच स्तर संतुलित ठेवण्यास टोमॅटो मास्क उपयुक्त ठरतो. पूर्ण पिकलेल्या एका टोमॅटोमध्ये एक चमचा मुलतानी माती मिसळून मिश्रण चांगले फेटून घ्या. हे मिश्रण केसाच्या मुळाशी लावा. अर्ध्या तासाने कोमट पाण्याने केस धुवा.

आहारात या दोन गोष्टींचा समावेश करा; मधुमेह आणि रक्तातील साखर राहिल नियंत्रणात

चहा पावडरचा उपयोग

चहा पावडरचे पाणी लिंबाप्रमाणेच चहा पावडरच्या पाण्यामध्येही नैसर्गिक आम्लाचे गुणधर्म असतात. केस धुताना चहा पावडरच्या पाण्याचा वापर केल्यास केस चमकदार होण्यासोबतच मजबूत देखील होतात.

केस धुणे

उन्हाळ्यात केसात घाम अधिक प्रमाणात साचतो. यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा केस स्वच्छ धुवा. केसांच्या पोतनुसार शाम्पू निवडा. तसेच केसांसाठी आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करा.

आणखी चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स…..

लिंबाचा रसलिंबाचा रस तेलकट

केसांसाठी लिंबाचा रस उपयुक्त आहे. लिंबामध्ये नैसर्गिक आम्ल गुणधर्म असतात. एक चमचा लिंबाचा रस एक कप पाण्यात मिसळून केसांच्या मुळाशी हलकी मालिश केल्यास केसांमधला तेलकटपणा दूर होतो. कोंडा कमी होण्यास मदत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी