29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeव्यापार-पैसाटपाल खात्याद्वारे व्यवसायाची संधी: 5 हजारांत लाखो कमवा; जाणून घ्या सविस्तर योजना

टपाल खात्याद्वारे व्यवसायाची संधी: 5 हजारांत लाखो कमवा; जाणून घ्या सविस्तर योजना

पोस्ट ऑफिस खात्याने तुमच्यासाठी कमाईची संधी उपलब्ध करुन दिली आहे. पोस्ट खात्याच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवयाच्या आणि त्यामाध्यमातून कमाई करायची अशी ही योजना आहे. त्यासाठी केवळ 5000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर कमाई करता येणार आहे. विशेषतः नव्याने विकसित होणाऱ्या शहरी भागात अधिक टपाल खाते उघडण्याची ग्राहकांकडून सतत मागणी होत आहे. ही मागणी आता फ्रँचायजीच्या माध्यमातून आता पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या माध्यमातून तरुणांना नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहे.

टपाल खाते फ्रेंचायजी योजना भारतीय टपाल खाते हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. सद्यस्थितीत भारतात जवळजवळ 1.55 लाख टपाल खाते आहेत. त्यापैकी 89% टपाल खाते हे ग्रामीण भागात आहेत. एवढी टपाल खात्यांची एवढी संख्या असूनही अद्यापही बन्याच ठिकाणी टपाल खात्याची सुविधा पोहोचलेली नाही. त्यामुळे लोकांना दूरवर जावे लागते. लोकांची गैरसोय टाळावी म्हणून टपाल खात्याने फ्रँचायजी सुविधा योजना सुरु केली आहे. फ्रेंचाइजी योजना टपाल कार्यालयांची मागणी कायम आहे. विशेषत: अवघ्या 5 हजार रुपयांमध्ये तुम्ही टपाल खात्याची फ्रँचायजी घेऊ शकता आणि लोकांना सुविधा देऊन तुम्हीही घरबसल्या पैसे मिळवू शकता. जाणून घ्या, पोस्ट ऑफिस फ्रेंचायजी योजनेबद्दल…

टपाल खात्याची फ्रँचायजी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला फक्त 5000 रुपये लागणार आहेत. येथे आपल्याला दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुम्ही फ्रेंचायजी आउटलेट सुरु करणे दुसरा म्हणजे टपाल खात्याचे एजंट बनणे. ज्या ठिकाणी टपाल खात्याची सुविधा नाही आणि तिथे मागणी आहे तर तिथे तुम्ही टपाल खात्याची फ्रेंचायजी घेऊन टपाल खाते सुरु करु शकता. तिथे टपाल खाते एजंट म्हणून ग्रामीण आणि शहरी दोन्ही परिसरात पोस्ट तिकीट आणि स्टेशनरी विकू शकता.

फ्रेंचायजी कोण घेऊ शकतो?
तुम्हाला टपाल खाते सुरु करायचे आहे तर त्याला काही अटींची पूर्तता करावी लागेल. त्या अटी पुढीलप्रमाणे आहेत.

१. टपाल खात्याची फ्रेंचायजी कोणतीही भारतीय व्यक्ती घेऊ शकतो.

२. त्या व्यक्तीने वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असावीत.

३. त्या व्यक्तीने किमान आठवी पास असणे गरजेचं आहे.

४. एक सुरक्षा म्हणून 5000 हजार रुपये भरणे गरजेचे आहे.

फ्रेंचायजी घेतली पुढे काय?

फ्रेंचायजी घेतल्यानंतर तुम्ही ज्या प्रकारचे काम करता त्यानुसार तुम्हाला टपाल विभागाकडून कमिशन मिळेल. जर टपाल खाते तुमच्या परिसरात खूप दूर असेल आणि तिथल्या सेवांना मागणी असेल, तर तुम्ही कमिशनमधून दरमहा लाखोंची कमाई करू शकता. टपाल खाते फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्ही इंडिया पोस्टच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. अर्ज करण्याची लिंक वेबसाइटवर दिली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी योजनेचा फॉर्म डाउनलोड करू शकता. यानंतर फॉर्म भरून सबमिट करावा लागेल. ज्यांचे अर्ज निवडले आहेत त्यांच्याशी टपाल विभाग करार करेल. यानंतर, तुम्ही स्वतः लोकांना टपाल खात्याची सेवा देऊ शकता.

फ्रँचायजी आउटलेटद्वारे केले जाऊ शकते?

  • स्टॅम्प आणि स्टेशनरीची विक्री नोंदणीकृत लेख, स्पीड पोस्ट लेख, मनी ऑर्डर बुक करणे.
  • पोस्टल लाइफ इन्शुरन्स (PLI) साठी एजंट म्हणून काम करणे आणि प्रीमियम संकलनासह विक्रीनंतरची सेवा प्रदान केले.
  • किरकोळ सेवा जसे की बिल / कर/ दंड संकलन / विभागाच्या देयक सेवा.
  • ई-गव्हर्नन्स आणि नागरिक केंद्रित सेवांची तरतूद सुलभ करणे.
  • विभागाकडून भविष्यात त्याच्या आउटलेटद्वारे सुरू करण्यात येणारी कोणतीही अन्य सेवा़.

हे सुद्धा वाचा: 

सुकन्या समृद्धी योजना: मुलीचे भविष्य होणार अधिकतम् सुरक्षित; जाणून घ्या कसे

भारतीय पोस्ट ऑफिसची लखपती करणारी ग्रामसुरक्षा योजना

अल्प बचत योजना: पॅन आधार अनिवार्य; अन्यथा चालू खाते बंद होईल!

post office scheme, Post Office Franchise, indian post office, Post Office Franchise scheme pay 5000 earn lakhs in indian post office, Post Office News

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी