33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeव्यापार-पैसासुपर मंडे : शेयर बाजाराने गुंतवणूकदारांना मालामाल केले; 6 लाख कोटी रुपयांची...

सुपर मंडे : शेयर बाजाराने गुंतवणूकदारांना मालामाल केले; 6 लाख कोटी रुपयांची कमाई !

शेयर बाजाराचे गणित काही नेमके कळेना. जगाला कोविडच्या साथीची भीती घातली जात असताना आजचा दिवस बाजारात सुपर मंडे ठरला. या एकाच दिवसात शेयर बाजाराने 6 लाख कोटी रुपयांची कमाई करून देत गुंतवणूकदारांना मालामाल केले. सुपर तेजीमुळे आज तब्बल 374 शेअर्समधील व्यवहार अप्पर सर्किट लावून थांबविण्यात आले. मुंबई निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 721 अंकांनी वधारला, तर राष्ट्रीय निर्देशांकाने 18,000च्यावर उसळी घेतली.

शेयर बाजाराचे गणित काही नेमके कळेना. जगाला कोविडच्या साथीची भीती घातली जात असताना आजचा दिवस बाजारात सुपर मंडे ठरला. (Super Monday in Stock Market) या एकाच दिवसात शेयर बाजाराने 6 लाख कोटी रुपयांची कमाई करून देत गुंतवणूकदारांना मालामाल केले. सुपर तेजीमुळे आज तब्बल 374 शेअर्समधील व्यवहार अप्पर सर्किट लावून थांबविण्यात आले. मुंबई निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 721 अंकांनी वधारला, तर राष्ट्रीय निर्देशांकाने 18,000च्यावर उसळी घेतली.

भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, आज बाजार खुलताच तेजीचे वारे वाहू लागले. फार्मा वगळता इतर सर्व क्षेत्रातील निर्देशांक (सेक्टोरेल इन्डेक्स) आज वधारून बंद झाले. 30 शेअर्सचा मुंबई, बीएसई निर्देशांक आज 1.20 टक्के म्हणजे 721.13 अंकांनी वाढून 60,566.42 अंकांवर पोहोचला. 50 शेअर्सचा राष्ट्रीय, एनएसई निर्देशांक 1.17 टक्के म्हणजे 207.80 अंकांनी वाढून 18,014.60 वर बंद झाला. सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. सरकारी बँक निर्देशांक त्यामुळे सुमारे 7 टक्क्यांनी वधारला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात अनुक्रमे 2.3 आणि 3% वाढ दिसून आली.

यापूर्वीचा व्यवहाराचा दिवस म्हणजे गेल्या शुक्रवारी, बीएसईवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण भांडवली मूल्य 272.12 लाख कोटी इतके होते. आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात 5.87 लाख कोटी रुपयांची जबरदस्त वाढ झाली. त्यामुळे बीएसईवरील सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल वाढून 277.99 लाख कोटी रुपये झाले आहे. बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्स आज तेजीत बंद झाले. एसबीआय, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील आणि आयटीसी लिमिटेड हे टॉप 5 गेनर ठरले. ते आज 2.59 टक्क्यांपासून 4.02 टक्के वाढीसह बंद झाले. तर बीएसई सेन्सेक्समधील 33 समभाग आज खालावून बंद झाले. नेस्ले इंडियात सर्वाधिक 1.17% ची घसरण दिसून आली. याशिवाय, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि सन फार्मा देखील घसरणीसह बंद झाले.

हे सुद्धा वाचा : 

शेअर मार्केटमधील अस्थिरतेतही;या शेअरने ग्राहकांना दिलाय 251 टक्क्यांचा रिटर्न

डाबर आता मसाल्यांचा बादशाह होणार! कंपनीने केली मोठी घोषणा

IPO मध्ये गुंतवणूक करताय? या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा

इंडियन ओव्हरसीज बँक, इझी ट्रिप प्लॅनर्स, जम्मू आणि काश्मीर बँक, कर्नाटक बँक, धनी सर्व्हिसेस, अदानी विल्मार, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी, डीबी रियल्टी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि रिलायन्स पॉवर इत्यादी शेअर्ससह आज सुमारे 374 शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागले. 232 शेअर्समध्येही लोअर सर्किट लागू केले गेले. दरम्यान, तेजीच्या वातावरणात आज 55 शेअर्सनी 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली. त्यात अरुणज्योती बायो व्हेंचर्स, भारत अॅग्री फर्टिलायझर्स, कॅप्टन पाईप्स, द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन्स, ईएफसीआय, इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स, गुजरात टूलरूम, नारायणी स्टील्स, एसजी फिनसर्व्ह आणि उषा मार्टिन इत्यादींचा समावेश आहे. त्याच वेळी, 212 शेअर एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.

Super Monday in Stock Market, Guntavnukdar Malamal, No Covid Fear in Share Market

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी