व्यापार-पैसा

Viral News : धक्कादायक! ऑनलाईन साईटवरून मागवला ड्रोन, हाती पडले बटाटे

देशात डिजिटल मीडियाचा वापर बऱ्यापैकी व्हायला लागला आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आता ऑनलाईन पद्धतीने करण्यावरच अनेकांचा भर असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये ऑनलाईन शाॅपिंगचा सुद्दा बराचसा सहभाग असून कित्येकजण बाजारात जाण्याऐवजी वेगवेगळ्या ऑनलाईन शाॅपिंग साईट्सना भेट देत तिथून हवे ते मागवत असतात. वेळ, पैसा आणि मेहनत असं सगळंच वाचवणारी ही यंत्रणा सध्याची क्रेझ ठरत आहे. परंतु जर तुम्ही मागवलेल्या गोष्टींऐवजी भलतंच काही येत असेल तर? अगदी बरोबर वाचलंत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका शाॅपिंगसाईटवरून ड्रोन मागवले असता हातात बटाट्याचे पार्सल पडल्याची घटना घडली आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे आणि त्यासंबंधीची बातमी सुद्धा माध्यमांनी चांगलीच लावून धरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील नालंदा येथील एका व्यक्तीने Meesho App वर वस्तुंच्या कमी किंमती पाहून ड्रोन घ्यावा असे वाटले. कमी किमतीत ड्रोन मिळणार या विचारानेच त्या व्यक्तीला एवढा आनंद झाला की त्याने लगेचच Meesho वर ऑर्डर प्लेस केली. ज्यावेळी डिलीवरी देणाऱ्याने हे मागवलेले पार्सल त्या व्यक्तीच्या स्वाधीन केले त्यावेळी त्या व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

लगेचच त्याने त्या डिलीवरी बाॅयसमोरच बाॅक्स उघडला आणि पाहतो तर काय त्या ऑनलाईन साईटने ड्रोनऐवजी चक्क बटाटे पाठवले होते. दरम्यान हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मीशोने स्वतः याबाबत पुढाकार घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कंपनी चौकशी करणार असून हे कृत्य ज्याने कोणी केले त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, तर ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीला कंपनीकडून रीफंड देण्याबाबत प्रक्रिया केली आहे. सणासुदीच्या वेळी बऱ्याचशा ऑनलाईन शाॅपिंग साईट्स चांगल्या डिस्काऊंटचे आमिष दाखवून आकर्षित करत असतात आणि यातूनच बऱ्याचदा फसवणुकीचे प्रकार घडतात.

हे सुद्धा वाचा…

Vegetable Rate : ऐन सणासुदीत भाजीपाल्याचे दर वाढले, किंमत ऐकून व्हाल थक्क

Six Air Bags : सहा एअर बॅगचा निर्णय 1 वर्ष पुढे ढकलला

Team India : जसप्रीत बुमराह टी20 विश्वचषकातून बाहेर, मोठी बातमी आली समोर

सदर घडलेली घटना पहिली नाही, याआधी सुद्दा एकाने Flipkart वर लॅपटाॅप मागितला असता लॅपटाॅपऐवजी बाॅक्समध्ये साबण मिळाल्याचे उघडकीस आले होते आणि ही घटना सुद्धा नुकतीच घडली आहे. याप्रकरणात सुदधा फ्लिपकार्टनेही रिफंड प्रक्रिया सुरू केली असून सदर ग्राहकाला त्याचे सगळे पैसे पुन्हा मिळणार आहे. ड्रोनच्या घटनेत त्या व्यक्तीने केवळ तक्रार नोंदवली नाही तर सदर प्रकार कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल करून याबाबत सावधानतेचा इशारा सुद्धा दिला.

दरम्यान या संपुर्ण गदारोळानंतर मिशोने सुद्धा आपली बाजू मांडण्यासाठी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात मिशो म्हणते, प्रथम युजर कंपनी म्हणून ग्राहकांना उत्तम अनुभव देणे हे आमचे प्राधान्य आहे. ग्राहकांच्या विश्वासाला तडा देणारी प्रत्येक घटना आम्ही गांभीर्याने घेत आहोत आणि त्यासाठी आम्ही तातडीने कारवाई करू. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर ग्राहक सेवा संघाने तातडीने पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत आणि पुढील आवश्यक ती पावले उचलू असे म्हणून या गैरप्रकाराचा त्यांनी सुद्धा निषेध नोंदवत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची (Towing) कारवाई सुरू झालेली आहे. मात्र असे…

2 mins ago

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…

33 mins ago

राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं?

मै शेरनी हूं और लढना भी जानती हूं, हे वाक्य आहे नुकत्याच झालेल्या रायबरेली(Raebareli) येथील…

38 mins ago

गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का; त्या प्रकरणाचा निकाल आला; बायकोचं पदही गेलं

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (ST…

57 mins ago

चर बाबत शासनाकडून अद्याप प्रतिसाद नाहीच;पाणी कपातीचे संकट कायम

उन्हाच्या वाढत्या झळांसोबतच नाशिककरांवर पाणी कपातीची ( Water crisis ) टांगती तलवार कायम आहे. त्यातच…

1 hour ago

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

14 hours ago