29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeव्यापार-पैसाशुद्ध शाकाहारी ग्राहकांना Zomato कडून मोठं गिफ्ट; पण डिलिव्हरी बॉयसंदर्भात मोठी बातमी

शुद्ध शाकाहारी ग्राहकांना Zomato कडून मोठं गिफ्ट; पण डिलिव्हरी बॉयसंदर्भात मोठी बातमी

झोमॅटो(Zomato) म्हटलं की, अनेकांच्या डोळ्यांसमोर लज्जदार पदार्थांच्या प्लेट्स येतात. प्रत्येक खवय्याला चविष्ट पदार्थ वेळेवर पोहचवण्याचे काम करणाऱ्या या झोमॅटोने (Zomato ) शुद्ध शाकाहारी ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. ज्याची चर्चा सध्या जगभर सुरु आहे. फूड डिलिव्हरी सर्व्हिस क्षेत्रातील आघाडीची कंपनी झोमॅटोनं देशातील शाकाहारी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं 'प्युअर व्हेज मोड' (Zomato Pure Veg Mode) आणि 'प्युअर व्हेज फ्लीट'(Zomato Pure Veg Fleet) या दोन सेवा सुरू केल्या आहेत. दरम्यान या सेवेसोबत डिलिव्हरी बॉयचा पेहरावही बदलणार असल्याची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

झोमॅटो(Zomato) म्हटलं की, अनेकांच्या डोळ्यांसमोर लज्जदार पदार्थांच्या प्लेट्स येतात. प्रत्येक खवय्याला चविष्ट पदार्थ वेळेवर पोहचवण्याचे काम करणाऱ्या या झोमॅटोने (Zomato ) शुद्ध शाकाहारी ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. ज्याची चर्चा सध्या जगभर सुरु आहे. फूड डिलिव्हरी सर्व्हिस क्षेत्रातील आघाडीची कंपनी झोमॅटोनं देशातील शाकाहारी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं ‘प्युअर व्हेज मोड’ (Zomato Pure Veg Mode) आणि ‘प्युअर व्हेज फ्लीट'(Zomato Pure Veg Fleet) या दोन सेवा सुरू केल्या आहेत. दरम्यान या सेवेसोबत डिलिव्हरी बॉयचा पेहरावही बदलणार असल्याची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

झोमॅटोने प्युअर व्हेज लोकांसाठी वेबसाईटवर खास पर्याय दिला आहे. या ‘प्युअर व्हेज फ्लिट’चे कर्मचारी हिरव्या रंगाचा टीशर्ट घालतील असं सांगितलं जात होतं. पण, ते लाल रंगाचा टीशर्ट घालणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. शाकाहारी ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात, झोमॅटोने ‘प्युअर व्हेज मोड’ सादर केले आहे.

जे केवळ शाकाहारी जेवण देणाऱ्या रेस्टॉरंट्सची निवड करते. भारतामध्ये शाकाहारी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या नागरिकांच्या आणि ग्राहकांच्या मागण्या विचारात घेऊन सेवा देणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही ही महत्त्वाची प्रणाली सुरु केल्याचे दीपंदर गोयल म्हणाले.

दीपेंदर गोयल यांनी नव्या उपक्रमाची माहिती देताना प्युअर व्हेज फ्लीटमधील डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हचा फोटोही शेअर केला आहे. त्यामुळे डिलिव्हरी बॉयने ग्रीन रंगाचा टी शर्ट परिधान केला होता. त्यामुळे शाकाहारी डिलिव्हरी बॉयचा पेहराव हिरवा असल्याची चर्चा रंगली. मात्र, डिलिव्हरी बॉयच्या पेहरावमध्ये कोणताही बदल नसल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. दीपंदर गोयल यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी