28 C
Mumbai
Sunday, February 16, 2025
Homeराजकीयअजित पवारांच्या अडचणीत वाढ? सर्वोच्च न्यायालयाचा केला अवमान

अजित पवारांच्या अडचणीत वाढ? सर्वोच्च न्यायालयाचा केला अवमान

सर्वोच्च न्यायालयाने काल अजित पवार(Ajit Pawar) यांच्या गटाला लोकसभा निवडणूक (Lok sabha election) प्रचारामध्ये घड्याळ चिन्हासोबत “घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर(supreme court) प्रलंबित आहे!” असे नमूद करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्देशानंतर राष्ट्रवादीच्या(NCP) ट्विटर अकाऊंटवर अजित पवारांचा (Ajit Pawar) फोटो शेअर करत 'अजितदादांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्षाला 'घड्याळ' चिन्ह वापरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मान्यता' असं थेट लिहण्यात आलं आहे. त्यामध्ये कुठेही सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख नसल्याने शरद पवार यांच्या गटाने हा मुद्दा उचलुन धरला आहे. शरद पवार यांच्या गटाने ट्विट करत न्यायालयाच्या अवमानाबद्दल आणि जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मागा अशी मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काल अजित पवार(Ajit Pawar) यांच्या गटाला लोकसभा निवडणूक (Lok sabha election) प्रचारामध्ये घड्याळ चिन्हासोबत “घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर(supreme court) प्रलंबित आहे!” असे नमूद करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्देशानंतर राष्ट्रवादीच्या(NCP) ट्विटर अकाऊंटवर अजित पवारांचा (Ajit Pawar) फोटो शेअर करत ‘अजितदादांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्षाला ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मान्यता’ असं थेट लिहण्यात आलं आहे. त्यामध्ये कुठेही सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख नसल्याने शरद पवार यांच्या गटाने हा मुद्दा उचलुन धरला आहे. शरद पवार यांच्या गटाने ट्विट करत न्यायालयाच्या अवमानाबद्दल आणि जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मागा अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडेलवर, ‘ना. अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाची मान्यता’ अशी कॅप्शन देत अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांना ही पोस्ट टॅग करण्यात आली आहे. यासोबतच #NCP #ncpspeaksofficial #घड्याळ_तेच_वेळ_नवी असे हॅशटॅग देण्यात आले आहेत.

अजित पवारांच्या पक्षाला सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश; “घड्याळ हेच चिन्ह…’

अजित पवार यांच्या गटाची ही पोस्ट रिट्विट करत शरद पवार यांच्या गटाने भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये अजित पवार यांना जाहिर माफी मागा अशी मागणी केली आहे.

शरद पवार यांच्या गटाने काय म्हटले आहे ट्विटमध्ये?

“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची मोडतोड करून जनतेला चुकीची माहिती देणं हे आपल्यासारखा स्वयंघोषित स्पष्टवक्तेपणावाल्यांना शोभत नाही…! असो, पण आता आम्हीच खरी माहिती जनतेपुढे आणतो!

काल सर्वोच्च न्यायालयाने विशेष याचिकेवर सुनावणीदरम्यान महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाच्या वापराबाबत अटी व शर्ती लागू करण्यात आल्या असून मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेतील वृत्तपत्रांव्दारे जाहिर नोटीस प्रसारित करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामध्ये घड्याळ चिन्हासोबत “घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे!” असे नमूद करण्यात येईल!

‘मलाही या ग्रेट-भेटीचा…’, दिल्ली दौऱ्यानंतर अमित ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया

दुस-या टप्प्यात अटी व शर्तींचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले आहे की, बॅनर्स, पोस्टर्स, व्हिडीओ किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी जिथे जिथे घड्याळ चिन्हाचा वापर करण्यात येईल त्या त्या ठिकाणी “घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे!” असे नमूद करावे. असा खणखणीत निर्देशच सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला देण्यात आला आहे.

परंतु आपण मात्र सदर ट्वीटव्दारे खोटी माहिती देऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाचाच अवमान केला आहे. खरी माहिती लपवून खोटं सांगत सर्वोच्च न्यायालयाने तुमच्यावर घातलेल्या अटी व शर्ती झाकण्याचा खटाटोप केलाच आहे तर, निर्देशांच्या अवमानाबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून होणा-या संभाव्य कारवाईलाही सामोरं जा म्हणजे झालं!!!

आणि हो… गेल्यावेळेसच्या ट्वीटप्रमाणे हे देखील ट्वीट डिलीट करू नका बरं… त्यामुळे किमान आताची तरी चूक मान्य करून न्यायालयाच्या अवमानाबद्दल आणि जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मागा!!!

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय आहेत?

“अजित पवार गटाने इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमांमध्ये नोटीस जारी करावी आणि प्रचाराच्या सर्व जाहिरातींमध्ये असे नमूद करावं की, त्यांना निवडणूक आयोगाने दिलेलं ‘घड्याळ’ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी हे पक्षनाव याबाबतचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे,” असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सिल्व्हर ओकच्या तुकड्यांवर जगणाऱ्यांनी….अंबादास दानवेंवर मनसेचा पलटवार

शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासून घड्याळ हे पक्षचिन्ह त्यांच्यासोबत होतं. मात्र आता ते निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्याने मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अजित पवार गटाने दुसऱ्या चिन्हाचा वापर करावा, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती.

याबाबत झालेल्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाबाबतची नोटीस सार्वजनिक करण्याचे आदेश अजित पवारांच्या पक्षाला दिले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी