29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयअजित पवारांचं टेन्शन वाढलं; बड्या नेत्यानं सोडली साथ

अजित पवारांचं टेन्शन वाढलं; बड्या नेत्यानं सोडली साथ

सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्षांकडून खेळल्या जाणार्‍या राजकीय डावपेचामुळे देशासह राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar)  यांचा टेन्शन वाढलं आहे. एका बड्या नेत्यांना त्यांना पत्र लिहीत त्यांची साथ सोडली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठं खिंडार पडलं आहे. अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोनावणे यांनी सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला आहे.

“मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा सादर करीत आहे” असा एका ओळीचा मजकूर या पत्रावर लिहिला आहे. तसेच या राजीनाम्याची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील सुपूर्द करण्यात आली आहे.

NCP

त्यांच्या या राजीनाम्यानंतर बजरंग सोनवणे शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनवणे शरद पवार यांच्या संपर्कात होते. पुण्यात त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती.

अजित पवारांच्या अडचणीत वाढ? सर्वोच्च न्यायालयाचा केला अवमान

2019 सालच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळेस धनंजय मुंडे हे सोनवणे यांच्यासोबत होते. मात्र आता महायुतीमधील चित्रं बदलल्याचं दिसत आहे. आता पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांना जिंकून देण्याचं आश्वासन हे त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. त्यामुळे बजरंग सोनवणे नाराज असल्याचे बोललं जात आहे.

कोण आहेत बजरंग सोनवणे ?

अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून बजरंग सोनवणे यांच्याकडे पाहिले जाते. शेतकरी पुत्र म्हणून बजरंग सोनवणे यांनी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या

या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला. येडेश्वरी शुगर या खासगी साखर कारखान्याचे ते चेअरमन व कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. केज विधानसभा मतदार सघात बजरंग सोनवणे यांचा स्वतःचा एक वेगळा गट आहे. बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी