30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeटॉप न्यूजचेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्याची स्टेडियमवर भन्नाट पोस्टरबाजी

चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्याची स्टेडियमवर भन्नाट पोस्टरबाजी

टीम लय भारी

शारजाह : शुक्रवारी पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सामन्या दरम्यान स्टेडियमवर एक मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली. चेन्नईच्या एका चाहत्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे (Chennai Super Kings fans display abandoned posters at the stadium).

या फोटोमध्ये चेन्नई संघाचा चाहता आरसीबीच्या (RCB) जर्सीमध्ये दिसत आहे. परंतु, त्याच्या हातात असलेल्या बॅनरमुळे तो जास्त चर्चेत आला आहे. या बॅनरवर लिहिले आहे की, ‘माझी बायको मला चेन्नई सुपर किंग्सची जर्सी घालण्यासाठी परवानगी देत नाही.’ मात्र त्या चाहत्याच्या अवतीभोवती आरसीबीच्या चाहत्यांचा धुमाकूळ दिसत आहे.

संजय राऊतांनी देशात पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्यांवर सामनातून केली टीका

भाऊ आयपीएस, बहिणीने रंगवलेल्या शाळेसमोर केला सन्मान

या फोटोवर लोकांनीसुद्धा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. जोरू का गुलाम म्हणत एकाने हसण्याचा ईमोजी टाकला आहे. तर, एका विक्रम नावाच्या युझरने तुमच्या सारखी माणसचं आरसीबीच्या हरण्याचे कारण बनतात असे म्हणत, नायक चित्रपटातील डायलॉग शेअर केला आहे.

एकनाथ शिंदेंनी मानले मंत्री जयंत पाटील यांचे तब्बल १७ वर्षांनंतर आभार

Chennai Super Kings on summit

चेन्नईने शेअर केलेल्या या भन्नाट फोटोला १७००० हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. चेन्नईने फोटो शेअर करत ‘प्रेम हे रंगीत आहे’ अशा प्रकारचा मथळा जोडला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी